JOIN US
मराठी बातम्या / मनी / अदानींचं नाव खरेदीदारांमध्ये येताच हा स्टॉक बनला रॉकेट! 28 फेब्रुवारीपासून सतत अपर सर्किट!

अदानींचं नाव खरेदीदारांमध्ये येताच हा स्टॉक बनला रॉकेट! 28 फेब्रुवारीपासून सतत अपर सर्किट!

HDIL Stock Upper Circuit: गेल्या महिन्यात अशी बातमी आली होती की, गौतम अदानी यांची कंपनी अदानी प्रॉपर्टीजसह(Adani Properties) एकूण आठ कंपन्या एचडीआयएल (HDIL) खरेदी करण्याच्या शर्यतीत आहेत. अदानी समूहाचे नाव या कंपनीशी जोडले गेल्यापासून शेअरमध्ये तुफानी वाढ होत आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 20 मार्च : रिअल इस्टेट डेव्हलपर कंपनी हाऊसिंग डेव्हलपमेंट इन्फ्रास्ट्रक्चर (HDIL) च्या शेअर्समध्ये गेल्या 20 दिवसांपासून सतत अपर सर्किट (Upper Circuit) दिसत आहे. 28 फेब्रुवारीपासून स्टॉकमध्ये अप्पर सर्किट सुरू झाले असून ते आतापर्यंत सुरू आहे. दरम्यान, या दिवाळखोर कंपनीत गुंतवणूक करण्यासाठी लोकांची झुंबड उडाली आहे. खरं तर, गेल्या महिन्यात बातमी आली होती की गौतम अदानी यांची कंपनी अदानी प्रॉपर्टीजसह (Adani Properties)एकूण आठ कंपन्या एचडीआयएल खरेदी करण्याच्या शर्यतीत आहेत. अदानी समूहाचे नाव या कंपनीशी जोडले गेल्यापासून शेअरमध्ये तुफानी वाढ होत आहे. एचडीआयएलच्या खरेदीदारांमध्ये अदानी समूहाचाही समावेश फेब्रुवारी महिन्यात, HDIL ने माहिती दिली होती की त्यांच्या सोल्युशन व्यावसायिकांना कंपनीच्या अधिग्रहणासाठी एकूण 16 निविदा प्राप्त झाल्या आहेत. ज्यामध्ये देशातील प्रसिद्ध उद्योगपती गौतम अदानी (Gautam Adani) यांची कंपनी अदानी प्रॉपर्टीज देखील आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अदानी एंटरप्रायझेसची उपकंपनी असलेली अदानी प्रॉपर्टीज एचडीआयएलच्या खरेदीदारांच्या शर्यतीत आघाडीवर आहे. याशिवाय, खरेदीदारांच्या यादीमध्ये शारदा कन्स्ट्रक्शन्स अँड कॉर्पोरेशन, बी-राइट रिअल इस्टेट, अर्बन अफोर्डेबल हाऊसिंग, टोस्कानो इन्फ्रास्ट्रक्चर आणि देव लँड अँड हाऊसिंग यांचा समावेश आहे. एचडीआयएलची रिझोल्यूशन प्रक्रिया गेल्या महिन्यात पुन्हा सुरू झाली. घाऊक डिझेलच्या दरात लिटरमागे 25 रुपयांची वाढ! महाराष्ट्रातील दर जाणून घ्या 28 फेब्रुवारीपासून सतत अप्पर सर्किट 28 फेब्रुवारी ते आत्तापर्यंत म्हणजेच 20 मार्च 2022 पर्यंत शेअर बाजारात एकूण 13 दिवसांचा व्यवहार झाला आहे, ज्या दरम्यान सर्व दिवस एचडीआयएलच्या शेअर्समध्ये अपर सर्किट दिसून आले आहे. 28 फेब्रुवारीला शेअरची किंमत 4.15 रुपये होती, जी आता 7.05 रुपये झाली आहे. HDIL च्या शेअर्समध्ये गेल्या 5 ट्रेडिंग सत्रांमध्ये 20 टक्क्यांनी वाढ झाली आहे. गेल्या एका महिन्यात 55 टक्के साठा संपला आहे. सध्या शेअर्सच्या या तेजीमध्ये कंपनीचे मार्केट कॅप (Market Cap) 334 कोटी रुपये झाले आहे. आता विना Ration Card घेता येणार धान्य, संसदेत सरकारची मोठी घोषणा जानेवारीमध्ये अपीलीय न्यायाधिकरणाने राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरणाचा (NCLT) निर्णय रद्द केला. NCLT ने गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये कॉर्पोरेट दिवाळखोरी आणि रिझोल्यूशन प्रक्रिया (CIRP) पूर्ण करण्याची अंतिम मुदत वाढवण्यास नकार दिला होता. कोट्यवधी रुपयांच्या पंजाब अँड महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह बँक (PMC Bank) घोटाळ्याप्रकरणी एचडीआयएलचे प्रवर्तक राकेश वाधवान आणि त्यांचा मुलगा सारंग वाधवान यांच्याविरोधात चौकशी सुरू आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या