मुंबई : सर्वात मोठी आणि धक्कादायक बातमी आहे. बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता आणि त्याची पत्नी अडचणीत आले आहेत. त्यांच्यावर सेबीची कारवाई केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. त्यानंतर अर्शदने सोशल मीडियावर पोस्ट देखील केली. मात्र त्यांच्यावर कारवाईचा बडगा उचलल्याने आता चर्चा सुरू झाली आहे. नेमकं काय आहे प्रकरण? बॉलीवूड अभिनेता अर्शद वारसी आणि त्याची पत्नी मारिया गोरेटीसह अन्य 44 जणांना यूट्यूब चॅनेलवर दिशाभूल करणारे व्हिडिओ अपलोड करून दोन कंपन्यांच्या शेअरच्या किमतीत हेराफेर केल्या प्रकरणी सेबीनं एक वर्षाची बंदी घातली आहे. मनी कंट्रोलने दिलेल्या माहितीनुसार सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (SEBI) ने गुरुवारी अभिनेता अर्शद वारसी, त्याची पत्नी मारिया गोरेटी आणि साधना ब्रॉडकास्ट प्रमोटर्ससह 31 संस्थांना सिक्युरिटीज मार्केटमध्ये ट्रेड करण्यासाठी बंदी घातली आहे. गुंतवणूकदारांना कंपनीचे शेअर्स विकत घेण्यास सुचवणारे दिशाभूल करणारे व्हिडिओ YouTube चॅनलवर पोस्ट केल्याप्रकरणी ही कठोर कारवाई करण्यात आली आहे. श्रेया गुप्ता, गौरव गुप्ता, सौरभ गुप्ता, पूजा अग्रवाल आणि वरुण एम. याशिवाय, यूट्यूब चॅनलवर दिशाभूल करणारा व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर या कंपन्यांना झालेला 41.85 कोटी रुपयांचा बेकायदेशीर नफाही नियामकाने जप्त करण्याचे आदेश दिले आहेत. सेबीच्या म्हणण्यानुसार अर्शद वारसीने 29.43 लाख रुपयांचा तर त्याच्या पत्नीने 37.56 लाख रुपयांचा नफा मिळवला आहे. सेबीला याबाबत तक्रार मिळाली होती. त्यानंतर सेबीने कारवाई केली आहे. सेबीने याबाबत एप्रिल ते सप्टेंबर 2022 मध्ये याबाबत चौकशी केली होती. एप्रिल ते जुलै या शेअरमध्ये वेगाने तेजी पाहायला मिळाली. त्यानंतर सेबीने ही कारवाई केली आहे.