JOIN US
मराठी बातम्या / मनी / Gold Rate : सोनं 60 हजारांखाली; भाव आणखी कमी होण्याचे संकेत

Gold Rate : सोनं 60 हजारांखाली; भाव आणखी कमी होण्याचे संकेत

वाढती मागणी आणि अमेरिकन बँकांनी व्याजाचे दर घटवल्याच्या परिणामासह काही प्रमुख बँका बंद झाल्याने सोन्याच्या दराने उच्चांक गाठला होता.

जाहिरात

सोन्याच्या किंमती वाढल्या

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

जळगाव : जळगावात दीड-दोन महिन्यानंतर सोन्याचे दर प्रति तोळा 60 हजार रुपयांच्या खाली आले आहे. मंगळवारी 60 हजार रुपयांवर असलेले सोने बुधवारी 400 आणि गुरुवारी 250 रुपयांनी घसरून 59 हजार 350 रुपये प्रति तोळा झाले. हे दर आणखी कमी होतील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. वाढती मागणी आणि अमेरिकन बँकांनी व्याजाचे दर घटवल्याच्या परिणामासह काही प्रमुख बँका बंद झाल्याने सोन्याच्या दराने उच्चांक गाठला होता. जूनच्या सुरुवातीपासून ते खाली येत आहे. 1 जून रोजी 60 हजार 600 रुपये प्रति तोळा असलेले सोन्याचे दर 13 जून रोजी 60 हजार रुपये होते. तुमचं सोनं किती शुद्ध आहे! 24 कॅरेटपासून ते 14 कॅरेट सोन्यात नेमका फरक काय? बुधवार आणि गुरुवारीही दरातील घसरण सुरूच होती. बाजारपेठेतील मागणीतील घटीमुळे आगामी काळात देखील सोन्याचे दर आणखी कमी होतील असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला आहे. त्यादृष्टीने ग्राहकांनी सोने खरेदीचे नियोजन करण्याचा सल्ला देखील तज्ज्ञांनी दिला आहे. सोन्याचा कोणताही प्रकार दागिन्यांसाठी सर्वोत्तम मानला जाऊ शकत नाही. वेगवेगळ्या कॅरेटच्या सोन्यामध्ये इतर प्रकारच्या सोन्यापेक्षा वेगळी वैशिष्ट्ये आहेत. तुम्हाला कोणत्या प्रकारचे दागिने घालायचे आहेत यावर ते अवलंबून आहे.

सोन्याची गुणवत्ता कॅरेटमध्ये मोजली जाते. सोने जितके शुद्ध असेल तितके ते सहजपणे वाकले जाऊ शकते. सोन्याच्या धातूच्या वस्तू वेगवेगळ्या आकारात बनवल्या जाऊ शकतात. सोन्याच्या धातूपासून बनवलेल्या वस्तू सहज तुटू नयेत म्हणून तिच्यापासून बनवलेल्या वस्तूला ताकद देण्यासाठी त्यामध्ये इतर धातू मिसळले जातात. सोनं अनेक कॅरेटमध्ये उपलब्ध असतं. प्रत्येक प्रकारच्या सोन्याची वेगळी स्पेशलीटी असते. आज आपण सर्व प्रकारच्या सोन्याविषयी जाणून घेणार आहोत. मोदी सरकारची ‘स्वस्त सोनं’ स्कीम सुपरहिट, पाच वर्षात पैसे झाले डबल 24 कॅरेट सोने 99.99 टक्के शुद्ध सोने आहे. यामध्ये इतर कोणताही धातू मिसळला जात नाही. 22 कॅरेट सोन्यात 91.67 टक्के शुद्ध सोने असते. उर्वरित 8.33 टक्के इतर धातूंचं मिश्रण असतं. जे 22 कॅरेट सोन्यात मिसळे जाते. 18 कॅरेट सोन्यात 75 टक्के शुद्ध सोने आणि 25 टक्के तांबे आणि चांदीचे मिश्रण असते. 18 कॅरेट सोन्यात या मिश्रणामुळे कडकपणा वाढतो. 14 कॅरेट सोन्यात इतर धातूंची भेसळ जास्त असते. त्यात फक्त 58.3 टक्के शुद्ध सोने आहे. उर्वरित 41.7 टक्के निकेल, चांदी, झिंक या धातूंमध्ये मिसळलेले आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या