JOIN US
मराठी बातम्या / मनी / Demat Accounts: शेअर बाजारातील गुंतवणूकरांच्या संख्येत वाढ, CDSL कडे 6 कोटी अॅक्टिव्ह डिमॅट अकाऊंट्स

Demat Accounts: शेअर बाजारातील गुंतवणूकरांच्या संख्येत वाढ, CDSL कडे 6 कोटी अॅक्टिव्ह डिमॅट अकाऊंट्स

Demat Accounts: नोव्हेंबर 2021 मध्ये, त्यांच्याकडे 5 कोटी खाती होती. अॅक्टिव्ह डिमॅट अकाऊंटच्या सर्वात मोठ्या डिपॉझिटरीला आणखी एक कोटी खाती जोडण्यासाठी फक्त 3 महिने लागले.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 1 मार्च : भारतीय शेअर बाजार (Share Market) सध्या मोठ्या अस्थिरतेच्या टप्प्यातून जात आहे , पण त्यामुळे पहिल्यांदा गुंतवणूक करणाऱ्यांवर काहीही परिणाम झालेला दिसत नाही. सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेड (National Securities Depository Ltd- CDSL) ने 1 मार्च रोजी सांगितले की त्यांच्याकडे आता 6 कोटी अॅक्टिव्ह डीमॅट खाती आहेत. नोव्हेंबर 2021 मध्ये, त्यांच्याकडे 5 कोटी खाती होती. अॅक्टिव्ह डिमॅट अकाऊंटच्या सर्वात मोठ्या डिपॉझिटरीला आणखी एक कोटी खाती जोडण्यासाठी फक्त 3 महिने लागले. सीडीएसएलचे एमडी आणि सीईओ नेहल वोरा (CDSL MD & CEO Nehal Vora) म्हणाले की, कॅपिटल मार्केट रेग्युलेटर, मार्केट इंफ्रास्ट्रक्चर इंस्टिट्यूशन्स, मार्केट मीडियेटरिज आणि सीडीएसएल कर्मचारी यांच्यामुळे हा टप्पा आणि वाढ साध्य झाली आहे. सेबीकडे अनेक वर्षांची दूरदृष्टी आहे. कठोर परिश्रम आणि नवीन कल्पना यामुळे, डिमॅट खाते उघडण्याची प्रक्रिया सुरक्षित आणि सोपी करण्यात आली आहे. सर्व बाजारातील सहभागींना परवडणाऱ्या किमतीत सोयीस्कर, विश्वासार्ह आणि सुरक्षित डिपॉझिटरी सेवा प्रदान करण्याच्या उद्देशाने CDSL ची स्थापना करण्यात आली होती. विशेष म्हणजे, डीमॅट खाते हे ट्रेडिंग करण्यायोग्य मालमत्तेच्या मालकीचे इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड आहे. शेअर्स, बाँड्स, सरकारी सिक्युरिटीज, ईटीएफ, म्युच्युअल फंड इत्यादींच्या खरेदी किंवा विक्रीसाठी हे आवश्यक आहे. सीडीएसएलचे चेअरमन बी.व्ही. चौबल म्हणाले की, नवीन डिमॅट खात्यांच्या नोंदणीचे लक्ष आता महानगरांपासून टियर II आणि III शहरांकडे वळवले जात आहे हे पाहून दिलासा मिळतो, जे भारतीय भांडवली बाजाराचा विस्तार दर्शविते. चौबल पुढे म्हणाले की, आमच्याकडे आता 6 कोटी डिमॅट खाती आहेत, तरीही आमची डिमॅट खाती अजूनही संपूर्ण लोकसंख्येसाठी खूपच कमी आहेत. आपल्या देशाच्या लोकसंख्येचा एक मोठा भाग अजूनही भारतीय सिक्युरिटीज मार्केटच्या विकासाच्या बाहेर आहे. त्यामुळे एक मोठी संधी अजूनही आहे. कंपनीच्या वेबसाइटनुसार, सीडीएसएलकडे जानेवारी 2022 पर्यंत 5.85 कोटी डिमॅट खाती होती आणि या खात्यांमध्ये असलेल्या मालमत्तेचे मूल्य 37.90 लाख कोटी रुपये होते. दुसरीकडे, नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (NSDL) कडे 2.54 कोटी डिमॅट खाती होती आणि त्यामध्ये असलेल्या मालमत्तेचे मूल्य 3 लाख कोटी रुपये होते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या