JOIN US
मराठी बातम्या / मनी / 5g launch in india : भारत चौथ्या औद्योगिक क्रांतीचे नेतृत्व करेल- पंतप्रधान मोदी

5g launch in india : भारत चौथ्या औद्योगिक क्रांतीचे नेतृत्व करेल- पंतप्रधान मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणातील महत्त्वाचे 5 मुद्दे

जाहिरात

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दिल्लीमध्ये 5G सेवेचा शुभारंभ केला. या सेवेमुळे सुपरफास्ट स्पीड मिळणार आहे. यामुळे शेतकऱ्यांपासून ते देशाच्या सुरक्षेपर्यंत अनेक गोष्टी सुपरफास्ट होतील. गाव आणि शहर यातील अंतर कमी होईल. नव्या नोकरीच्या संधी उपलब्ध होतील. एक नाही तर असे अनेक फायदे भारताला आणि सर्वसामान्य लोकांना होणार आहे. या शुभारंभात बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खूप महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या. डिजिटल इंडियाने प्रत्येक नागरिकाला स्थान दिले आहे. अगदी लहान रस्त्यावरील विक्रेते देखील UPI ची सुविधा वापरत आहेत. सरकारने मध्यस्थांशिवाय नागरिकांपर्यंत थेट पैसे पोहोचवले. तंत्रज्ञान आणि दूरसंचार क्षेत्रातील प्रगतीमुळे भारत चौथ्या औद्योगिक क्रांतीचे नेतृत्व करेल अशी आशा पंतप्रधान मोगी यांनी व्यक्त केली आहे.

संबंधित बातम्या

पीएम मोदी पुढे म्हणाले की, आधी 1GB डेटासाठी 300 रुपये मोजावे लागत होते. आता त्याची किंमत 10 रुपये जीबीवर आली आहे.

भारतातील एक व्यक्ती दरमहा 14GB वापरते. 2014 मध्ये त्याची दरमहा सुमारे 4200 रुपये किंमत होती. आता त्याची किंमत 125-150 रुपये आहे. आमच्या सरकारच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झालं आहे असंही पंतप्रधान मोदी म्हणाले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या