JOIN US
मराठी बातम्या / मनी / तुमच्याकडे असणारी 500 ची नोट नकली तर नाही ना? अशाप्रकारे झटक्यात ओळखा

तुमच्याकडे असणारी 500 ची नोट नकली तर नाही ना? अशाप्रकारे झटक्यात ओळखा

बाजारात मागील काही दिवसांपासून नकली नोटा (Fake Note) चलनात येत आहेत. अगदी खऱ्या नोटेप्रमाणेच हुबेहुब दिसणाऱ्या नकली नोटांमुळे सामान्य माणसांची फसवणूक होते. अशा असली-नकली नोटांमधला फरक समजणं कठीण आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 05 फेब्रुवारी: बाजारात मागील काही दिवसांपासून नकली नोटा (Fake Note) चलनात येत आहेत. अगदी खऱ्या नोटेप्रमाणेच हुबेहुब दिसणाऱ्या नकली नोटांमुळे सामान्य माणसांची फसवणूक होते. अशा असली-नकली नोटांमधला फरक समजणं कठीण आहे. अशा प्रकरणात सर्वांनाच अलर्ट राहणं गरजेचं आहे. तुमच्या खिशात असलेली 500 रुपयांची (500 rupee Note) नोट खोटी आहे की खरी, ही चिंता तुम्हाला सतावत असेल आणि जर तुम्हाला 500 रुपयांची नोट असली-नकली ओळखणं समजणे कठीण जात असेल, तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. तुमच्याकडील 500 रुपयांची नोट नकली असेल तर एका झटक्यात 500 रुपयांचे नुकसान होते. अशा परिस्थितीत तुम्हाला खऱ्या आणि बनावट नोटांमधील फरक माहीत असणं आवश्यक आहे. नोटेची ओळख करण्यासाठी 15 मुख्य संकेत किंवा चिन्ह आहेत. ज्याद्वारे तुम्ही सहजपणे सांगू शकता की कोणती नोट खरी आहे आणि कोणती नकली आहे. तर हे संकेत कोणते आहेत, हे जाणून घेऊयात. » तुम्ही नोटेला एखाद्या लाईटसमोर ठेवा, त्यावर तुम्हाला 500 लिहिलेलं दिसेल. » 500 ची नोट ओळखण्यासाठी तुमच्या डोळ्याच्या समोर 45 डिग्री अँगलवर नोट ठेवा, त्या जागी 500 लिहिलेलं दिसेल. » नोटेवर देवनागरीमध्ये 500 संख्या लिहिलेली असते. हे वाचा- रिटायरमेंटपूर्वी व्हाल करोडपती, गुंतवणूकीचा ‘हा’ पर्याय ठरेल एकदम BEST » नव्या नोटांमध्ये जुन्या नोटांच्या तुलनेत महात्मा गांधींच्या फोटोची दिशा आणि जागा थोडी बदलेली आहे. ते तुम्ही पाहू शकता. » महात्मा गांधींचा फोटो एकदम मध्यात दाखवण्यात आला आहे. » नोटेला थोडंसं दुमडल्यानंतर सिक्युरिटी थ्रेडचा रंग हिरवा ते निळा असा बदलताना दिसतो. » नव्या नोटांमध्ये जुन्या नोटेच्या तुलनेत, गॅरंटी क्लॉज, गव्हर्नरची स्वाक्षरी, प्रॉमिस क्लॉज आणि आरबीआयचा लोगो उजव्या बाजूला दिसेल. » नोटेवर महात्मा गांधींचा फोटो आणि इलेक्ट्रोटाईप वॉटरमार्कही दिसतो. » नोटेत वरच्या डाव्या बाजूला आणि खाली उजव्या बाजूला लिहलेले नंबर डावीकडून उजवीकडे मोठे झालेले दिसतील. » नोटेवरील 500 चा रंग बदलतो. याचा रंग हिरवा ते निळा असा होतो. » खऱ्या नोटांमध्ये उजव्या बाजूला अशोक स्तंभ दिसतो. नोटेच्या उजव्या बाजूला बॉक्समध्ये 500 लिहलेलं असतं. तसंच डाव्या आणि उजव्या बाजूला 5 ब्लीड लाईन्स असतात. ज्या उठून दिसतात. » नोटच्या मागच्या बाजूला नोटेच्या छपाईचं वर्ष लिहिलेलं असतं. हे वाचा- Cryptocurrency च्या मार्केट कॅपमध्ये घसरण; मात्र Bitcoin, Ethereum मध्ये उसळी » याशिवाय, खऱ्या नोटांवर स्लोगनसह स्वच्छ भारतचा लोगो प्रिंट असतो. » नोटेच्या मधल्या भागात भाषेचं पॅनल दिसतं. » 500 रुपयांच्या खऱ्या नोटेवर भारतीय ध्वजासह लाल किल्ल्याचा फोटो आहे. » देवनागरीमध्ये 500 लिहलेले असते. दृष्टिहीनांनी अशी ओळखावी नोट भारतीय चलनातील नोटांवर दृष्टिहीनांसाठी काही खास ओळखचिन्ह आहेत. 500 रुपयांच्या खऱ्या नोटांमध्ये अंध व्यक्तींना लक्षात घेऊन महात्मा गांधीचा फोटो, अशोक स्तंभाचे प्रतीक, ब्लीड लाईन्स ही ओळख चिन्ह असतात. जेणेकरुन नोटेला हात लावताच स्पर्शाने दृष्टिहीन व्यक्तीलाही ती असली की नकली हे समजू शकतं. तर या संकेतांचा वापर करून तुम्ही तुमच्याकडील नोट ही खरी आहे की खोटी हे ओळखू शकता.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या