JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनी / या दहा सरकारी बँका देत आहेत सर्वांत कमी व्याजदराने शैक्षणिक कर्ज

या दहा सरकारी बँका देत आहेत सर्वांत कमी व्याजदराने शैक्षणिक कर्ज

जर तुम्ही उच्च शिक्षणासाठी कर्ज घेण्याचा विचार करत असाल तर, अशा 10 सरकारी बँकांबद्दल जाणून घ्या, ज्यांच्या 20 लाख रुपयांपर्यंतच्या शैक्षणिक कर्जावर सर्वात कमी व्याजदर आहे. या बँकांमध्ये तुम्हाला कर्जाच्या परतफेडीसाठी 7 वर्षांचा कालावधी देखील मिळतो. bankbazaar.com ने या बँकांची यादी तयार केली आहे.

0110

IDBI बँक - या बँकेकडून 6.75 टक्के व्याजदराने शिक्षणासाठी कर्ज मिळत आहे. 20 लाख रुपयांच्या कर्जाची परतफेड करण्यासाठी 7 वर्षे मिळतील. म्हणजेच त्याची EMI 29,942 रुपये असेल.

जाहिरात
0210

सेंट्रल बँक ऑफ इंडिया - या बँकेचा व्याजदर 6.85 टक्के आहे. 7 वर्षांच्या परतफेडीच्या कालावधीसाठी, दरमहा 30,039 रुपये EMI भरावा लागेल.

जाहिरात
0310

इंडियन बँक - या बँकेचा व्याज दर 6.9 टक्के आहे. याची परतफेड करताना 30,088 रुपये EMI भरावा लागेल.

जाहिरात
0410

युनियन बँक - या कर्जावरील व्याजदर 7 टक्के आहे. 7 वर्षांच्या काळासाठी EMI 30,185 रुपये असेल.

जाहिरात
0510

बँक ऑफ बडोदा - बँक ऑफ बडोदाकडून 7.15 टक्के व्याजदराने शैक्षणिक कर्ज मिळेल.

जाहिरात
0610

पंजाब नॅशनल बँक - पंजाब नॅशनल बँकेकडून 7.15 टक्के व्याजदराने शैक्षणिक कर्ज मिळेल.

जाहिरात
0710

SBI - SBI चा व्याजदर 7.25 टक्के आहे. याची परतफेड करण्यासाठी 30,340 रुपयांचा ईएमआय भरावा लागेल.

जाहिरात
0810

बँक ऑफ इंडिया - SBI प्रमाणे, यावर देखील 7.25 टक्के व्याजदर आहे आणि परतफेड करताना 30,340 रुपये EMI भरावा लागेल.

जाहिरात
0910

इंडियन ओव्हरसीज बँक - येथील शैक्षणिक कर्जासाठी व्याज दर 7.25 टक्के आहे. कर्ज परतफेड कालावधी 7 वर्षे आहे.

जाहिरात
1010

कॅनरा बँक - ही बँक वरील सर्वांपेक्षा जास्त म्हणजे 7.30 टक्के व्याजदराने कर्ज देत आहे. जर तुम्ही येथून कर्ज घेतलं तर, तुम्हाला दरमहा 30,480 रुपये EMI भरावा लागेल.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या