29 सप्टेंबर : केंद्र सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय शिवसेनेनं घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी भारतात परतल्यानंतर केंद्रीय अवजड उद्योगमंत्री आणि शिवसेना नेते अनंत गीते त्यांची भेट घेऊन त्यांच्याकडे मंत्रिपदाचा राजीनामा देतील. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकारांशी बोलताना हे स्पष्ट केले. यामुळे युती तुटल्यानंतर शिवसेना आता केंद्र सरकारमधूनही बाहेर पडणार, हे स्पष्ट झाले आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल आपल्या पहिल्याच प्रचार सभेत ‘शिवसेनेचा अपमान झाला असताना केंद्रातलं मंत्रिपद का ठेवलं?, अनंत गीतेंनी मंत्रिपदाचा राजीनामा का दिला नाही?, महापालिकेतील युती का ठेवलीये?’ असे प्रश्न उपस्थित केले होते. त्या पार्श्वभूमीवर आज(सोमवारी) मुंबईमध्ये पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना उद्धव ठाकरे यांनी ‘मोदी भारतात परतल्यावर अनंत गीते त्यांची भेट घेतील आणि मंत्रिपदाचा राजीनामा देतील, असे स्पष्ट केले. तसचं मुंबई महापालिकेतही भाजपसोबतची युती तुटणार का, या प्रश्नाला उत्तर देताना मी शांतपणे सर्व निर्णय घेत असतो, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले. आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर 25 वर्षांपासूनची शिवसेना भाजपची युती तुटली. त्यात महायुतीतल्या इतर घटक पक्षांनी भाजपसोबतचं रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे भाजपने युती तोडल्यानंतर केंद्र सरकारमध्ये मंत्री असलेले अनंत गीते राजीनामा देणार का, असा प्रश्न पुढे आला होता. त्यावर अनंत गीते केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा देणार असल्याचं उद्धव ठाकरेंनी जाहीर केलं आहे.
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++
बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्र अकाऊंटसोबत
Follow @ibnlokmattv // <![CDATA[ !function(d,s,id){var js,fjs=d.getElementsByTagName(s)[0],p=/^http:/.test(d.location)?‘http’:‘https’;if(!d.getElementById(id)){js=d.createElement(s);js.id=id;js.src=p+’://platform.twitter.com/widgets.js’;fjs.parentNode.insertBefore(js,fjs);}}(document, ‘script’, ’twitter-wjs’); // ]]> |
---|
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++