24 सप्टेंबर : महायुतीत जागावाटपावरून सुरू असलेल्या खेचाखेचीत मित्रपक्षांच्या महानाराजीनाट्याने भर घातली. आता मात्र ही नाराजी दूर झाली असल्याचं चित्र आहे. भाजप आणि शिवसेनेनं अखेरीस 14 जागा देण्याची तयारी दर्शवल्यानंतर घटकपक्षांनी तलवार म्यान केली आहे. राजू शेट्टी आणि महादेव जानकर यांनी मातोश्रीवरून बाहेर पडल्यानंतर जागा मान्य असल्याचं जाहीर केलं. त्यामुळे आता उद्या महायुतीची घोषणा होण्याची शक्यता आहे.
मित्रपक्षांनी सात जागांवरून सात सोडण्याची धमकी दिल्यानंतर युतीच्या नेत्यांची एकच धावपळ सुरू झाली. संध्याकाळी वांद्र्यात बैठक झाल्यानंतर महायुतीत तणाव निवळण्याची चिन्ह उमटली. रात्री पुन्हा एकदा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या निवास्थानी ‘मातोश्री’वर बैठक सुरू झाली. या बैठकीतनवा फॉर्म्युला सादर झाला. त्यानुसार शिवसेनेनं 150, भाजपनं 125 आणि घटकपक्षांनी 13 जागा लढवाव्यात, असा प्रस्ताव पुढे आलाय. पण 151 जागांवर शिवसेना ठाम असल्याचं सेनेचे खासदार संजय राऊत यांनी सांगितलंय. दुसरीकडे 13 जागा कोणाच्या गोटातून सोडल्या जातील हे शिवसेना भाजपनं ठरवावं अशी मागणी घटकपक्षांनी केली. अखेरीस हो नाही हो म्हणत 14 जागा देण्याची युतीने तयारी दर्शवली. मातोश्रीवर बैठक आटोपून बाहेर आल्यानंतर महादेव जानकर यांनी जागावाटपावर समाधानी असल्याचं सांगितलं. तर आता किती ताणायचं आम्हालाच त्यांची कीव आली त्यामुळे आम्ही नरमाईची भूमिका घेतली असं स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी सांगितलं. दरम्यान या अगोदर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांची मध्यस्थी कामी आली, 7 जागा सोडल्यामुळे घटक पक्ष नाराज झाले होते. त्यानंतर अमित शहा यांनी राजू शेट्टी, रामदास आठवले या नेत्यांशी फोनवरून चर्चा केली. त्यानंतर महायुतीमध्ये समेटाची चिन्हं दिसून आली. अखेरीस घटकपक्षांनी हट्टाची भूमिका घेत तहात जिंकले आणि महायुतीला तारले. आता उद्या उद्धव ठाकरे महायुतीची घोषणा करण्याची शक्यता आहे. नवा प्रस्ताव शिवसेना - 150, भाजप 125, मित्रपक्ष 14 +++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++
बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्र अकाऊंटसोबत
Follow @ibnlokmattv // <![CDATA[ !function(d,s,id){var js,fjs=d.getElementsByTagName(s)[0],p=/^http:/.test(d.location)?‘http’:‘https’;if(!d.getElementById(id)){js=d.createElement(s);js.id=id;js.src=p+’://platform.twitter.com/widgets.js’;fjs.parentNode.insertBefore(js,fjs);}}(document, ‘script’, ’twitter-wjs’); // ]]> |
---|
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++