23 ऑगस्ट : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा एकदा शिवसेना विरुद्ध मनसे वाद पेटण्याची चिन्ह आहे. मुंबईत भांडुपमध्ये मनसेच्या थीम पार्कचं भूमिपूजन मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते झालं. ‘माझे जग’ असं या थीम पार्कचं नाव आहे. दोन दिवसांपूर्वी महापालिकेत मनसेनं त्याचं सादरीकरण केलं होतं. पण या भूमिपूजन सोहळ्याला वादाचं गालबोट लागलंय. थीमपार्कची जमीन ही मीठागर विभागाची असून त्याची रितसर कायदेशीर परवानगी घेतली नसल्याचं शिवसेनेचं म्हणणं आहे. तर मनसेनं मात्र आम्ही या पार्कसाठी सर्व कायदेशीर बाबींची पुर्तता केल्याचा दावा केला आहे. मनसेचं थीमपार्क हे चुकीचं आहे. ‘मुंगेरी लाल के हसीन सपने’ असं काही दाखवण्याचा हा प्रयास आहे. मुळात मतदारांची दिशाभूल करण्याचा हा प्रकार आहे या जागेसाठी कोणतीही परवानगी घेण्यात आलेली नाही असा दावा शिवसेनेचे विभाग अध्यक्ष दत्ता दळवी यांनी केलाय. तर शिवसेनेचे आरोप धादांत खोटे आहे. ही जागा महाराष्ट्र शासनाची आहे. त्यासाठी पालिकेची परवानगी घेऊनच थीम पार्कचं भूमिपूजन करण्यात आलंय असा दावा मनसेचे विभाग अध्यक्ष उदय सामंत यांनी केलाय. विशेष म्हणजे हा संपूर्ण प्रकल्प डीपीडीसीच्या मदतीने पूर्ण केला जाणार आहे. पण विकासाला केवळ विरोध करणं सेनेचं काम आहे अशी टीकाही त्यांनी केली. विशेष म्हणजे या अगोदर वायफाय वादावरुन मनसे शिवसेना आमनेसामने आली होती. शिवाजीपार्कमध्ये सेनेच्या अगोदर बाजी मारुन मनसेनं वायफाय सेवा सुरू केली होती. आताही उद्धव ठाकरे यांनी थीमपार्कची संकल्पाना साकारली होती पण मनसेनं इंथही बाजी मारुन थीमपार्कचं भूमिपूजनही केलंय. +++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++
बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्र अकाऊंटसोबत
Follow @ibnlokmattv // <![CDATA[ !function(d,s,id){var js,fjs=d.getElementsByTagName(s)[0],p=/^http:/.test(d.location)?‘http’:‘https’;if(!d.getElementById(id)){js=d.createElement(s);js.id=id;js.src=p+’://platform.twitter.com/widgets.js’;fjs.parentNode.insertBefore(js,fjs);}}(document, ‘script’, ’twitter-wjs’); // ]]> |
---|
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++