JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / बसमध्ये सीटवर बसू दिले नाही, मित्रांना बोलावून तरुणाला बेदम मारहाण, VIDEO

बसमध्ये सीटवर बसू दिले नाही, मित्रांना बोलावून तरुणाला बेदम मारहाण, VIDEO

काही वेळात उल्हासनगरच्या शहाड ब्रिजजवळ बस येताच राजू आणि त्याच्या टोळीने बस थांबवली. त्यातील योगेशला खाली उतरवले आणि…

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

 उल्हासनगर, 19 जुलै : बसच्या सीटवर बसण्यावरून झालेल्या वादातून एका तरुणावर टोळीने जीवघेणा हल्ला केला आहे. उल्हासनगरमध्ये (ullhasnagar) घडलेला हा धक्कादायक प्रकार  सीसीटीव्हीत कैद झाला आहे. विशेष म्हणजे, भररस्त्यात सकाळी 8 च्या सुमारास कंपनीची खाजगी बस थांबवून हा जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यात योगेश केहरी हा तरुण गंभीर जखमी झाला आहे. योगेश हा भिवंडी येथील myntra या ऑनलाइन शॉपिंग कंपनीमध्ये काम करतो.योगेश हा 14 तारखेला कामावरून घरी येण्यासाठी कंपनीच्या बसमध्ये बसला. याच वेळी राजू सय्यद यांनी ‘मला सीटवर बसू दे उठ’ असे योगेशला म्हणाला. मात्र तब्येत बरी नसल्याने योगेश सीटवरून उठला नाही. याचा राजूला राग आला.

दरम्यान, आरोपी राजू सय्यद ५ ते ६ जणांना शहाड ब्रिजजवळ बोलवून घेतले. काही वेळात उल्हासनगरच्या शहाड ब्रिजजवळ बस येताच राजू आणि त्याच्या टोळीने बस थांबवली. त्यातील योगेशला खाली उतरवले आणि थेट लोखंडी रॉड, दांडक्याने त्यांच्यावर जीवघेणा हल्ला केला. योगेशने जीव वाचवण्यासाठी पळ काढला, मात्र यात योगेश हा गंभीर जखमी झाला आहे. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. IND vs SL : टीम इंडिया होणार नंबर 1! पाकिस्तानला मागे टाकणार दरम्यान, माझा मुलगा योगेशवर हल्ला झाल्यानंतर मी त्याला घेऊन उल्हासनगर पोलीस स्टेशन तर कधी कल्याण खडकपाडा पोलीस स्टेशन या ठिकाणी चकरा मारल्या. मात्र, सुरुवातीला पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेण्यास टाळाटाळ केली. त्यामुळे माझ्या मुलाला रुग्णालयात दाखल करते. तुम्ही गुन्हा दाखल करत नसाल तर काही हरकत नाही, असं योगेशच्या आईने पोलिसांना सांगितलं. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असा आरोप योगेश आईने केलेला आहे. तर या प्रकरणी मुख्य आरोपी राजू सय्यद याला अटक झाली आहे. अजून सीसीटीव्हीचे मार्फत इतरांचा या गुन्ह्यात किती सहभाग आहे. त्या संदर्भातला तपास करून आणखी काही जणांना ताब्यात घेतला जाईल, असे सहाय्यक पोलीस आयुक्त धुला टेळे यांनी सांगितले आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या