मुंबई, 16 नोव्हेंबर : चार महिन्यापूर्वी शिवसेनेतील 40 आमदार फुटल्याने महाविकास आघाडीला सत्तेतून पाय उतार व्हावं लागलं. यामुळे मागच्या चार महिन्यांपासून महाविकास आघाडी विरूद्ध शिंदे गट आणि भाजप असा कलगीतुरा रंगत आहे. महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष शिंदे गटाच्या आमदारांवर सडकून टीका करत असल्याने रोज नव्याने राजकीय घडामोड घडत आहे. दरम्यान काल झालेल्या नेहरू जयंतीवेळी शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी जवाहरलाल नेहरूंवर टीका केली होती. यावर काँग्रेस आमदार यशोमती ठाकूर यांनी संजय गायकवाड यांचा चांगलाच समाचार घेतला आहे.
राहुल गांधींची भारत जोडो यात्रा ही महाराष्ट्रातील बुलडाण्याच्या दिशेने जात आहे. अशातच भारत जोडो यात्रेवरून देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहेरू यांना त्यांच्या वाढदिवशीच लक्ष्य करत आमदार संजय गायकवाड यांनी नेहेरुंवर बोचरी टीका केली होती. यावर आज काँग्रेसच्या नेत्या आमदार यशोमती ठाकूर यांनी पलटवार करत शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांची अक्कल काढली.
हे ही वाचा : ‘उर्मटपणा म्हणजे नेतृत्त्व नाही’, सुषमा अंधारेंचा राज ठाकरेंना सणसणीत टोला
तसेच त्यानी इतिहासाचा दाखला देत इतिहास माहिती नाही त्यांनी इतिहासाचे वाचन करावं टीका करण्यासाठी ही अक्कल लागते अशी परखड टीका ठाकूर यांनी केली. त्या पुढे म्हणाल्या की, या गद्दारांनी आपल्या बापाच्या पाठीत खंजीर खुपसली त्यांना काय निष्ठा काही माहिती असेल.
बापाच्या पाठीत खंजीर खुपसणाऱ्या गद्दार आमदारांबद्दल काय बोलणार? त्यांनी तर 4 महिन्यांपूर्वी गद्दारी केली आहे त्यांच्यावर बोलण्यासारखं काही राहिलेलं नाही असे म्हणत ठाकूर यांनी बोलण्याचं टाळलं.
हे ही वाचा : विनायक मेटे कार अपघात प्रकरणाला नवे वळण, सीआयडीची मोठी कारवाई
तर सुषमा अंधारे म्हणतात
‘2023 ला मध्यवधी निवडणुका लागतील, भाजपमध्ये धुसफूस सुरू आहे. बाहेरून आलेल्यांना स्पेस दिला जातो यातून खदखद सुरू आहे. त्यामुळे निवडणुका लागण्याची शक्यता आहे’ असं भाकित शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी व्यक्त केलं. तसंच, देवेंद्र फडणवीस यांना विनयभंगाची व्याखा शिकवावी लागेल, असा टोलाही अंधारे यांनी लगावला. सुषमा अंधारे कोल्हापूरच्या दौऱ्यावर होत्या. यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेतली. राज्यातील घडामोडी आणि शिंदे सरकारवर जोरदार टीकाही केली.