JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / धक्कादायक! मुंबईतील अपंग मुलाला शिर्डीतील क्वारंटाईन सेंटरमध्ये अमानुष मारहाण

धक्कादायक! मुंबईतील अपंग मुलाला शिर्डीतील क्वारंटाईन सेंटरमध्ये अमानुष मारहाण

तलाठ्यानेच ही अमानुष मारहाण केल्याची माहिती उघड झाली आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

शिर्डी, 28 मे : राज्यात कोरोनाबाधितांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. त्यातही मुंबई, पुणे, ठाणे या भागात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. अशा परिस्थितीत राज्यात विविध ठिकाणी क्वारंटाईन सेंटर उभारण्यात आले आहे. मात्र अनेक क्वारंटाईन सेंटरमध्ये रुग्णांना वाईट वागणूक दिली जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. शिर्डी येथे क्वारंटाईन सेंटरमध्ये असलेल्या अपंग मुलाला अमानुषपणे मारहाण करण्यात आली. अकोले तालुक्यातील वाघापूर गावातील ही धक्कादायक घटना समोर आली आहे. तलाठ्यानेच ही अमानुष मारहाण केल्याची माहिती उघड झाली आहे. तलाठी राजेंद्र पवार असं त्यांच नाव आहे. ‘इकडं का आला’ असं म्हणत ही मारहाण केली आहे. हा अपंग मुलगा चेंबूर या ठिकाणाहून आलेला असल्याचे सांगितले जात आहे. क्वारंनटाईनमध्ये असलेला मुलगा बाहेर आल्यानंतर त्याला ही मारहाण केली असल्याची माहिती सांगितली जात आहे. देशातील विविध क्वारंटाईन सेंटरमधून अशा अनेक घटना समोर येत आहे. काही दिवसांपूर्वी  मुरादाबादमधील क्वारंटाईन सेंटरमध्ये पाठविलेल्या बार डान्सरनी मंगळवारी सायंकाळी येथे गोंधळ घातला होता. त्यांनी येथे बिअरची मागणी करीत सेंटरमध्ये धुडगूस घातला. यामध्ये एका महिलेने तर आपल्या 3 वर्षांच्या मुलाला बाल्कनीत लटकवून खाली फेकून देण्याची धमकी दिली होती. क्वारंटाईन सेंटरमधील अनेक घटना वारंवार समोर येत आहेत हे वाचा- पोलीस दलालाही कोरोनाचा विळखा; पुन्हा एक महिला IPS अधिकारी कोरोना पॉझिटिव्ह सिंधुदुर्गातील कोरोना रोखण्यासाठी नितेश राणेंची धाव; नागरिकांसाठी उचललं पाऊल

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या