JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / जेवणाच्या उधारीसाठी हॉटेलमालकाने का अडवलं? सदाभाऊ खोतांचा राष्ट्रवादीवरच आरोप, म्हणाले...

जेवणाच्या उधारीसाठी हॉटेलमालकाने का अडवलं? सदाभाऊ खोतांचा राष्ट्रवादीवरच आरोप, म्हणाले...

या प्रकरणी पोलिसांमध्ये तक्रार केली आहे. पोलिसांनी एका जणाला ताब्यात घेतलं आहे,अशी माहिती सदाभाऊ खोत यांनी दिली.

जाहिरात

या प्रकरणी पोलिसांमध्ये तक्रार केली आहे. पोलिसांनी एका जणाला ताब्यात घेतलं आहे,अशी माहिती सदाभाऊ खोत यांनी दिली.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

पंढरपूर, 16 जून : हॉटेलमध्ये जेवणाची उधारी थकल्यामुळे एका हॉटेलमालकाने माजी मंत्री आणि रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत ( Sadabhau Khot)  यांना अडवल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. पण, तो राष्ट्रवादीचा (NCP) कार्यकर्ता होता, असा दावाच सदाभाऊ खोत यांनी केला. तसंच, या प्रकरणी पोलिसांमध्ये तक्रारही दाखल केली, असल्याचे सदाभाऊ खोत यांनी सांगितलं. ‘पंचायतराज समितीच्या माध्यमातून सोलापूर दौऱ्यावर मी आहे. सांगोल्यामध्ये आलो होतो. त्यावेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी माझा ताफा अडवण्याचा प्रयत्न केला. अंगावर येण्याचाही प्रयत्न केला. जाणीवपूर्वक गोंधळ घालण्याचा प्रकार केला आहे. हा प्रकार निषेधार्ह आहेच. या प्रकरणी पोलिसांमध्ये तक्रार केली आहे. पोलिसांनी एका जणाला ताब्यात घेतलं आहे,अशी माहिती सदाभाऊ खोत यांनी दिली.

पण अशा प्रकारे सदाभाऊ खोत यांचा आवाज कधीच राष्ट्रवादीला कदापी दाबता येणार नाही.  आम्ही शेवटपर्यंत प्रस्तापितांच्या विरोधा निश्चितपणे लढत राहू, असंही सदाभाऊ खोत म्हणाले. नेमक काय घडलं? 2014 च्या लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान ‘हॉटेलची उधारी द्या, मगच पुढं जावा’ असे म्हणत सांगोला येथील अशोक शिनगारे या हॉटेल मालकाने आज दुपारी पंचायत समितीच्या आवारात माजी मंत्री सदाभाऊ खोत यांना अडवले. पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या समोरच उधारी साठी शिनगारे यांनी सदाभाऊ खोत यांच्याबरोबर हुज्जत घातली.

विशेष म्हणजे, अशोक शिनगारे हे २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत सदाभाऊ खोत यांचे कार्यकर्ते होते.  निवडणुकीमध्ये अशोक शिनगारे यांनी पदर मोड करून उधारीने जेवणावळी घातल्या होत्या. त्याची उधारी अद्याप सदाभाऊ खोत यांच्याकडे थकीत आहे. वारंवार उधारीची मागणी करून‌ ही मिळत नसल्याने संतप्त झालेल्या अशोक शिनगारे यांनी आज सदाभाऊ खोत यांना अडवून ‘आधी उधारी द्या आणि मग पुढे जावा’ असं म्हणत त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला.‌ त्यामुळे एकच गोंधळ उडाला. सदाभाऊंच्या समर्थकांनी शिनगारे यांची समजूत काढली. पण, शिनगारे यांनी उधारीचे पैसे द्याच, असा मागणी लावून धरली. खुद्द सदाभाऊ खोत गाडीतून खाली उतरले आणि त्यांनी शिनगारे यांची समजूत काढली. कशीबशी समजूत काढून  सदाभाऊंनी हॉटेलमालकाच्या तावडीतून सुटका करून घेतली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या