बारामती 14 जुलै: बारामतीमध्ये कोरोनाचा उद्रेक वाढतो आहे. रुग्णसंख्या वाढत असल्याने शहरात लॉकडाऊनची (Bramati Locdown) घोषणाही करण्यात आली आहे. कोरोनाविरुद्धच्या या लढ्यात खासदार शरद पवार यांनी बारामतीकरांसाठी (Sharad Pwar at Bramati) मोठं योगदान दिलं आहे. संपुर्ण जगभरात कोरोनाग्रस्तांना उपयुक्त असलेली रेमीडेसेव्हर (Remdesivir) या औषधाची 100 इंजेक्शन्स शरद पवार यांनी आज बारामती मेडिकल कॉलेजच्या स्वाधीन केली. आता गरजू रुग्णांसाठी ती वापरण्यात येणार आहे. बारामती येथील मेडिकल कॉलेजचे अधिष्ठाता डॉ. संजयकुमार तांबे यांच्याकडे आज त्यांनी ही इंजेक्शन्स सुपूर्द केली. बारामतीकरांच्या दृष्टीने ही इंजेक्शन्स महत्वाची ठरणार असून ज्यांना आवश्यकता असेल त्यांच्यासाठी या इंजेक्शन्सचा वापर करण्याची सूचना खासदार शरद पवार यांनी केली आहे. या प्रसंगी बारामतीच्या नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, गटनेते सचिन सातव, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर या प्रसंगी उपस्थित होते. त्यानंतर शरद पवार यांनी बारामतीतील कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा घेतला. बारामतीत गुरुवार पासुन लॉकडाऊन जाहीर करण्यात आलं आहे. Online classesसाठी आता शाळांची मनमानी बंद, केंद्राने जाहीर केले नवे नियम कोरोनाची स्थिती आटोक्यात राहिल यासाठी आवश्यक सर्व त्या सर्व उपाययोजना करण्याच्या सूचनाही पवार यांनी प्रशासनास दिल्या आहेत. कोरोनाच्या गंभीर रुग्णांसाठी ही इंजेक्शन्स प्रभावी ठरली आहेत. त्यामुळे त्यांना जगभरातून मागणीही आहे. भारतातही ही लस प्रभावी ठरली आहे. बारामतीमध्ये याआधी बारामती पॅटर्न लागू करण्यात आला होता. आता कोरोनाचा उद्रेक वाढल्याने त्याचा नव्याने आढावा घेण्यात येत आहे. वाचा काय होता ‘बारामती पॅटर्न’ बारामती शहरात कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी नगरपरिषदेच्या परिसरातील 44 वार्डामधील 44 नगरसेवक 44 झोनल ऑफिसर व 44 पोलिस कर्मचारी नेमले होते. प्रत्येक वार्डातील दहा ते वीस स्वयंसेवकांच्या माध्यमातून नागरिकांना अत्यावश्यक घरपोच सुविधा पोहोचवण्यात येणार आहेत. त्यामुळे कुठल्याही नागरिकांना आता घराबाहेर पडता येणार नाही, याबाबत काळजी घेतण्यात आली होती. कोरोनामुळे बदणार रेल्वेचं रुप आणि प्रवास, अशा असतील नव्या सुविधा; पाहा PHOTOS बारामती शहरातील एका स्वयंसेवकास लॉकडाऊनच्या कालावधीत 35 ते 40 कुटुंबाची सेवा करण्याची संधी मिळली. स्वयंसेवकांनी प्रत्येकाच्या घरी जाऊन त्यांना सेवा दिली. ज्या कुटुंबीयांना अत्यावश्यक बाबीची गरज भासेल त्या नागरिकांनी त्यांना कॉल केल्यावर अत्यावश्यक सेवा करता लागणारा खर्च (त्या वस्तू खरेदीकरता येणारा खर्च) त्या कुटुंबातील व्यक्तीकडून घेण्यात आला होता.