JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / महाराष्ट्रात भाजपला बसू शकतो आणखी एक धक्का, खासदार कमी होणार?

महाराष्ट्रात भाजपला बसू शकतो आणखी एक धक्का, खासदार कमी होणार?

काँग्रेसचे दिग्गज नेते आणि माजी केंद्रीय मंत्र्यांना पराभवाचा धक्का दिलेल्या भाजप खासदारांचे सदस्यत्व धोक्यात.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

सोलापूर, 15 फेब्रुवारी : लोकसभा निवडणुकीत भाजपने अभूतपूर्व यश मिळवलं. महाराष्ट्रातही जोरदार मुसंडी मारली पण आता सोलापूरचे भाजप खासदार डॉ. जयसिद्धेश्वर स्वामी यांचे सदस्यत्व धोक्यात आलं आहे. जयसिद्धेश्वर स्वामींच्या जात प्रमाणपत्राबाबत तक्रार दाखल करण्यात आली होती. याचा अंतिम निर्णय लवकरच जाहीर होणार आहे. सोलापूरमध्ये जात पडताळणी समितीने तक्रारीवर सुनावणी घेतली. जयसिद्धेश्वर स्वामी यांनी बेडा जंगम जातीचा दाखला सादर केला होता. पण हे जात प्रमाणपत्र बनावट असल्याचा आरोप करत तक्रार दाखल केली होती. भाजप खासदार जयसिद्धेश्वर स्वामी यांच्याविरुद्ध प्रमोद गायकवाड, मिलिंद मुळे आणि विनायक कंडकुरे यांनी तक्रार दाखल केली होती. हिंदू लिंगायत जात असताना बेडा जंगम जातीचा दाखला दिल्याचा आरोप त्यांनी यामध्ये केला होता. याप्रकरणाचा अहवाल सादर करण्यात आला. यामध्ये जयसिद्धेश्वर स्वामी यांनी पुरावा म्हणून दिलेला दाखला संशयास्पद असल्याचं नमूद करण्यात आलं आहे. त्यामुळे जयसिद्धेश्वर स्वामींची खासदारकी अडचणीत आली आहे. जातीच्या दाखल्याची तक्रार दाखल झाल्यानंतर त्यावर सुनावणी घेणाऱ्या समितीचं काम दबावाखाली असल्याचं जयसिद्धेश्वर स्वामींच्या वकिलांनी म्हटलं आहे. मात्र, जिल्हा जात पडताळणी समितीने स्वामींचा अर्ज फेटाळून लावला आहे. दक्षता समितीने अहवाल आपल्याला मान्य नसून आपण उच्च न्यायालयात अपील करणार असल्याचं स्वामींच्या वकिलांनी सांगितले. वाचा : महाविकास आघाडीत बिघाडी झाल्यास भाजपचे 2 पर्याय, पाहा VIDEO सोलापूर मतदारसंघ अनुसूचित जातींसाठी राखीव आहे. त्यामुळे याठिकाणी इतर जातीच्या उमेदवारांना निवडणूक लढवता येत नाही. जर जात पडताळणी समितीनं जयसिद्धेश्वर स्वामी यांचं प्रमाणपत्र अवैध ठरवल्यास त्यांची खासदारकी जाऊ शकते. तसं झाल्यास ते याविरुद्धसुद्धा उच्च न्यायालयात दाद मागू शकतात. जयसिद्धेश्वर स्वामी यांच्याविरोधात वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर आणि काँग्रेसचे दिग्गज नेते सुशिलकुमार शिंदे हे होते. वाचा : राज ठाकरे म्हणाले पक्षातच आहे गद्दार, 2 दिवसांत नावं समोर आणून करणार हकालपट्टी

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या