JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Weather Updates In Maharashtra: राज्यातल्या 'या' भागात पुढील 5 दिवस पावसाच्या मुसळधार सरी, हवामान खात्याकडून अलर्ट

Weather Updates In Maharashtra: राज्यातल्या 'या' भागात पुढील 5 दिवस पावसाच्या मुसळधार सरी, हवामान खात्याकडून अलर्ट

Weather Updates: कोकण, मध्य महाराष्ट्राच्या दक्षिण भागात मॉन्सूनच्या पावसाने (Monsoon Rain) हजेरी लावली आहे. राज्याच्या कमाल तापमानातही (Temperature) घट होऊ लागली आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 13 जून: कोकण, मध्य महाराष्ट्राच्या दक्षिण भागात मॉन्सूनच्या पावसाने (Monsoon Rain) हजेरी लावली आहे. राज्याच्या कमाल तापमानातही (Temperature) घट होऊ लागली आहे. सोमवारपासून पुढील चार दिवस मुंबईमध्ये (Mumbai) हलक्या ते मध्यम सरीचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. अरबी समुद्राच्या किनारी भागातील कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाल्याने राज्यातील मध्य महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, पालघर या भागात वादळी वारे, मेघगर्जना, विजांसह पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. पुढील पाच दिवस जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. तसेच कोकणात पुढील 24 तासात अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. पंतप्रधानांच्या पुणे दौऱ्यापूर्वी पोलिसांची मोठी कारवाई,  तब्बल 1105 काडतुसे जप्त   राज्यात येत्या पाच 5 दिवसासाठी मुसळधार ते अति मुसळधार पाऊस होणार, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे. तसेच महाराष्ट्रातील कोकण या भागात सर्वात जास्त पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान खात्याचे के. एस. होसाळीकर यांनी ट्विट करत ही माहिती दिली. दरम्यान विदर्भातील काही भागात मान्सून पूर्व पाऊस पडत आहे. अद्यापही विदर्भ, मराठवाडा, सोलापूर या भागात मान्सूनला सुरुवात झाली नाही. दरम्यान पुढच्या दोन दिवसांत मान्सूनला या भागातही सुरुवात होईल अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे. मुंबईत मात्र हवामान चांगलं आहे. (Mumbai Weather) मान्सूनची चाहुल लागली आहे. अनेक भागात जोरदार पाऊस (Heavy Rain in Mumbai) झाला. जोरदार वारे वाहत आहेत. यातच आता हवामान खात्याने (IMD) पुढील पाच दिवसांसाठी एक इशारा दिला आहे. भूक मंदावणे, पचनक्रिया बिघडण्याची काय आहेत कारणं? आहारतज्ज्ञांचा सल्ला जाणून घ्या   राज्याच्या विविध भागांत पूर्वमोसमी पावसाने जोरदार हजेरी लावली असतानाच, मॉन्सून तळ कोकणात दाखल झाला आहे. दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यांत जोरदार पावसाची शक्यता आहे. तर राज्याच्या उर्वरित भागातही वादळी वारे, मेघगर्जना विजांसह पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या