JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Maharashtra Weather Update : यंदा परतीचा पाऊस लाबंणीवर, नवरात्र जाणार पावसात, हवामान विभागाकडून अंदाज

Maharashtra Weather Update : यंदा परतीचा पाऊस लाबंणीवर, नवरात्र जाणार पावसात, हवामान विभागाकडून अंदाज

परतीच्या पावसाची चाहूल काही भागात दिली आहे. राज्याच्या काही भागांत 30 सप्टेंबरपासून 6 ऑक्टोबरपर्यंत पावसाचा जोर काहीसा वाढण्याची शक्यता आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 25 सप्टेंबर : जुलैच्या पहिल्या आठवड्यात सुरूवात केलेल्या पावसाने परतीच्या पावसाची चाहूल काही भागात दिली आहे. राज्याच्या काही भागांत 30 सप्टेंबरपासून 6 ऑक्टोबरपर्यंत पावसाचा जोर काहीसा वाढण्याची शक्यता आहे, त्यामुळेही राज्यातून मान्सूनचा परतीचा प्रवास उशिरा होण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजात हे नमूद करण्यात आले आहे.

विदर्भ आणि कोकण-गोवा वगळता उर्वरित महाराष्ट्रात पुढील दोन-तीन दिवसांत पावसाचा जोर कमी होईल. उत्तर-मध्य कोकणात ३० सप्टेंबरपर्यंत सरासरीपेक्षा काहीसा जास्त पाऊस पडण्याचा अंदाज आहे. ३० सप्टेंबर ते ६ ऑक्टोबर या काळात उत्तर मध्य महाराष्ट्र, संपूर्ण विदर्भ आणि दक्षिण कोकणात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडू शकतो, तर पुण्यासह उर्वरित राज्यात त्या कालावधीत सामान्य पाऊस पडू शकतो.

हे ही वाचा :  बिअर, वाईन.. मर्यादित प्रमाणात घेतल्यास होतात अनेक फायदे; संशोधकांचा दावा

संबंधित बातम्या

मागच्या चार दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने पुन्हा थैमान घालण्यास सुरूवात केली आहे. काही तासांसापून मुंबई आणि उपनगरात पावसाची रिपरिप सुरू आहे. मुंबई शहरासह दादर, रावळी कँप यासह अन्य भागात पावसाने हजेरी लावली आहे. दरम्यान, आज (दि.24) आणि उद्या (दि.25) कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही आणि तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता असल्याची माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली आहे.

जाहिरात

कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्रासह मराठवाडा, विदर्भात 27 सप्टेंबर पर्यंत पाऊस कायम राहणार असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. कोकण, गोवा आणि विदर्भात काही ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाची नोंद झाली आहे. दरम्यान, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोलीत जोरदार पावसाची शक्यता असून हवामान विभागाने या ठिकाणी यलो अलर्ट जारी केला आहे. वायव्य भारतातील मैदानी भागात पुढील 2 दिवसांत पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे.

जाहिरात

हे ही वाचा :  Aadhar Card: भारीच! आता रेल्वे स्टेशनवर होणार आधारशी संबंधित ‘ही’ कामं, लोकांना होणार फायदा

26 सप्टेंबरला लातूर, नांदेड, परभणी, वाशिम, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आले आहेत. 27 सप्टेंबर रोजी जळगाव, औरंगाबाद, जालना, बुलढाणा, परभणी, लातूर, नांदेड, अकोला, वाशिम, यवतमाळ, अमरावती, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोलीला यलो अलर्ट देण्यात आला आहे. 28 सप्टेंबरला विदर्भातील सर्व जिल्ह्यांना, मराठवाड्यातील परभणी, उस्मानाबाद, नांदेड जिल्हे वगळता सर्व जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर उत्तर महाराष्ट्रातील जळगावला देखील यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

जाहिरात
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या