मुंबई 09 ऑगस्ट : महाराष्ट्रात गेल्या दोन आठवड्यांपासून पावसाने उसंत घेतलेली होती. पण दोन आठवड्यांच्या ब्रेकनंतर पावसाने पुन्हा एन्ट्री मारली. राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये मागील 3-4 दिवसांपासून प्रचंड मुसळधार पाऊस पडतोय. अनेक ठिकाणी पावसाने थैमान घालायला सुरुवात केली आहे. अशात आता आजही अनेक जिल्ह्यांना रेड आणि ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. शेतकरी भर पावसात उभे होते पण मुख्यमंत्री आलेच नाही, शिंदेंनी लगेच केला फोन आणि… आज मुंबई आणि पुण्यासह अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस कोसळणार असल्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवला आहे. पावसाचं हे आक्राळविक्राळ रुप पुढच्या दोन ते तीन दिवसांसाठी तसंच असू शकतं, असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. काही ठिकाणी खरंच नद्यांना पूर आल्यासारखी परिस्थिती आहे. त्यामुळे प्रशासनावरील दबाव वाढताना दिसतोय. नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन केलं जात आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पालघर, रायगड, नाशिक, पुणे, चंद्रपूर, गडचिरोली आणि गोंदिया या सात जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. आजचा दिवस हा पावसासाठी फार महत्त्वाचा आहे.
या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट - कोल्हापूर, सातारा, नांदेड, अमरावती, ठाणे मुंबई, रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे. याठिकाणी आजही मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. सावधान! 7 जिल्ह्यांत RED alert; अर्ध्या महाराष्ट्राला 3 दिवसांसाठी मुसळधार इशारा या जिल्ह्यांना येलो अलर्ट - सिंधुदुर्ग, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहमदनगर, औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, अकोला, भंडारा, बुलडाणा, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.