JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / ऐन कार्तिकीलाही VIP Culture; शिंदे गटातील मंत्र्यामुळे पंढरीत वारकऱ्यांची दैना

ऐन कार्तिकीलाही VIP Culture; शिंदे गटातील मंत्र्यामुळे पंढरीत वारकऱ्यांची दैना

ऐन कार्तिकीच्या एकादशीच्या दिवशीही या व्हीआयपी कल्चरचा सर्वसामान्य वारकऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागला.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

पंढरपूर, 4 नोव्हेंबर : आज कार्तिकी एकादशी आहे. त्यामुळे कृषीमंत्री अब्दुल सत्तारही पंढरपुरात आले होते. मात्र, एकीकडे एकादशीच्या निमित्ताने पंढरपुरात वारकऱ्यांची गर्दी असताना दुसरीकडे मंत्री अब्दुल सत्तार यांचा ताफा थेट मंदिरापर्यंत होता. त्यामुळे मंत्री अब्दुल सत्तार यांच्या ताफ्याचा सर्वसामान्य वारकऱ्यांना फटका बसला.

ऐन कार्तिकीच्या एकादशीच्या दिवशीही या व्हीआयपी कल्चरचा सर्वसामान्य वारकऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागला. ऐन कार्तिकी एकादशीच्या दिवशी भरगर्दीत कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी ताफा मंदिरापाशी आणल्याने यांच्या बेफिकीर पणाचा फटका सामान्य वारकऱ्यांना सहन करावा लागला. त्यामुळे राज्य सरकार पंढरपूर तिर्थक्षेत्र विकास आराखड्यासाठी प्रयत्नशील आहे. असे असताना भविष्यात होणारा विकास नेमका कुणासाठी आहे? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे.

फडणवीसांच्या हस्ते श्री विठ्ठल-रुक्मिणीची महापूजा – 

संबंधित बातम्या

दरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या हस्ते आज पहाटे कार्तिकी एकादशीनिमित्त पंढरपुरात श्री विठ्ठल-रुक्मिणीची महापूजा करण्यात आली. देवेंद्र फडणवीस यांनी 4 वेळा मुख्यमंत्री म्हणून आषाढीची शासकीय महापूजा केली आहे. यावेळी त्यांना प्रथमच कर्तिकीचा मान मिळाला. तर मानाचे वारकरी म्हणून औरंगाबाद जिल्ह्यातील उत्तमराव साळुंखे यांना शासकीय महापूजेचा मान मिळाला. औरंगाबाद जिल्ह्यातील उत्तमराव साळुंखे दाम्पत्य मानाचे वारकरी ठरले.

हेही वाचा –  आषाढीची तहान कार्तिकीवर, साडेचार वर्ष अन् दोन संधी हुकल्यावर फडणवीस विठुरायाचरणी पुन्हा आले!

कार्तिकी एकादशीच्या निमित्ताने विठ्ठल-रूक्मिणी मंदिरात विविध देशी आणि विदेशी आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे. सजावटीसाठी मोगरा, जरबेरा, आष्टर, झेंडू, गुलाब,कॉनवर अशा विविध देशी विदेशी 30 प्रकारच्या पाच टन फुलांचा वापर करण्यात आला आहे. कार्तिकी एकादशीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सपत्नीक पंढरपुरात दाखल झाले आणि वारकऱ्यांबरोबर ग्यानबा-तुकारामचा तालही धरला. साळुंखे दाम्पत्याने विठूरायाची महापूजा करण्याची संधी मिळूनही स्वतःसाठी काही न मागता राज्यातील सर्व शेतकऱ्यांवरील संकट दूर करण्यासाठी विठू-रखूमाईला साकडं घातलं

जाहिरात
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या