JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / कोरोनासारख्या गंभीर संकटातही कुटुंबातील व्यक्तीला अखेरचा निरोप देताना घडली चूक, 52 जणांविरोधात गुन्हा दाखल

कोरोनासारख्या गंभीर संकटातही कुटुंबातील व्यक्तीला अखेरचा निरोप देताना घडली चूक, 52 जणांविरोधात गुन्हा दाखल

मंगळवेढा येथील जवळपास 52 जणांवर राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मंगळवेढा, 6 एप्रिल : कोरोनासारख्या गंभीर संकटाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमध्ये जमावबंदीचा आदेश मोडणं मंगळवेढ्यातील नागरिकांना महागात पडलं आहे. घरातील व्यक्तीचं निधन झाल्यानंतर मोजक्याच लोकांमध्ये मृत व्यक्तीवर अंत्यसंस्कार करणं अपेक्षित होतं. मात्र अनेक लोकांच्या उपस्थिती अंत्यविधी पार पाडल्यानंतर मंगळवेढ्यात तब्बल 52 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंगळवेढा शहरातील बोराळे नाका येथे असलेल्या स्मशानभूमीत जमावबंदीचा आदेशाचा भंग करून साथीच्या रोगाचा प्रसार होईल याची जाणीव असतानाही घरातून बाहेर पडल्याप्रकरणी मंगळवेढा येथील जवळपास 52 जणांवर राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंगळवेढा शहरात पोलीस नाईक गजानन पाटील, सहाय्यक पोलीस निरिक्षक मारकड, पोलीस नाईक अमर सुरवसे, पोलीस शिपाई निशिकांत येळे व होमगार्ड असे कोरोना या संसर्गजन्य विषाणूचा प्रसार रोखण्याकामी मंगळवेढा शहर व बीट हद्दीत पेट्रोलिंग करत असताना सायंकाळी साडेचारच्या दरम्यान बोराळे नाका परिसरात असलेल्या स्मशानभूमीत एका शवास अग्नी देण्यासाठी 52 लोक एकत्रितरित्या तोंडाला मास्क न लावता थांबलेले निदर्शनास आले. हेही वाचा- VIDEO: 6 वर्षांच्या मुलानं दुसऱ्यांदा मृत्यूला हरवलं, फुफ्फुसाच्या आजारानंतर आता कोरोनावर मात देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना या संसर्गजन आजाराच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देश लॉकडाऊन करून नागरिकांना बाहेर येण्यास मनाई केली आहे. मात्र वरील नागरिकांनी अशा परिस्थितीत घरातून विनाकारण बाहेर पडून बेदरकारपणे मानवी जिवीत व व्यक्तिगत सुरक्षा धोक्यात येईल असे कृत्य करून संसर्ग पसरविण्याचे घातकी कृत्य करून शासनाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी अधिक तपास पोलीस करत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या