राज्यात गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. अशात मराठवाडा आणि विदर्भात मुसळधार पावसामुळे अनेक गावांत पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे.
प्रविण तंडेकर, प्रतिनिधी भंडारा, 30 ऑगस्ट : राज्यात गेले दोन दिवस मुसळधार पाऊस सुरू आहे. अशात विदर्भ, मराठवाडा मागातही मुसळधार पावसाने हजेरी लावली. पूर्व विदर्भात मुसळधार पावसानं हाहाकार मांडला आहे. अनेक शहरांना जोडणारे मार्ग बंद करण्यात आले आहेत. त्यामुळे महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश सीमेवरील अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. अशात भंडारा जिल्ह्यातील वैनगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडल्याची माहिती देण्यात येत आहे. भंडारा शहराला लागून असलेल्या वैनगंगा नदी आणि शहरात पावसाने कहर केला आहे. त्याचा ड्रोननी टिपलेला एक व्हिडिओही समोर आला आहे. वैनगंगा नदी पुलावरून पाणी वाहत असल्याने आष्टी-चंद्रपूर मार्ग बंद करण्यात आला आहे. चंद्रपुरचा दक्षिण गडचिरोलीसोबत असलेल्या गावांचा संपर्क खंडीत झाला असल्याचीही माहिती देण्यात आली आहे. एका क्षणात गायब झाला भला मोठा पूल, पाहा धक्कादायक अपघाताचे भीषण PHOTOS सतत चालू असलेल्या पावसामुळे गोसेखुर्द धरनाच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली असल्याने गोसेखुर्दचे पाणी सोडले असल्याने वैनगंगेच्या पात्रात पाणी वाढले. त्यामुळे आष्टी नदीवरील पूल उंच नसल्याने त्यावर रात्री 2 वाजता पासून पाणी वाहने सुरू झाले आहे. त्या करीता वाहतूक बंद आहे.
दरम्यान, यंदा रामटेकमध्ये पहिल्यांदा तोतला व नवेगांव खैरी धरणाचे दरवाजे 5.5 मिटरने उघडण्यात आले आहेत. तोतला धरणाचे 14 तर नवेगांव खैरीचे 16 दरवाजे 40 वर्षांत पहिल्यांदा उघडण्यात आले आहेत. पेंच नदी आणि कन्हान नदीला पूर आला आहे. दोन्ही नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. त्यामुळे रामटेक, नागपूरहून पारशिवनी, सावनेर जाणारे मार्ग बंद करण्यात आले आहेत. त्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. BMC ने सील केली गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांची इमारत, नेमकं काय झालं? गडचिरोली जिल्ह्यातील वैनगंगा, प्राणहिता व गोदावरी नदीच्या पाणी पातळीत होणारी वाढ लक्षात घेता सर्व तहसिलदार व स्थानिक स्वराज्य संस्था यांनी नदीकिनारी भागात वेळोवेळी अधिनस्त कर्मचाऱ्यांकडून दवंडी द्यावी तसेच प्राप्त परिस्थितीचा विचार करुन विविध विभागांच्या समन्वयातून आवश्यकता पडल्यास तात्काळ सदर परिसरातील लोकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्याची व्यवस्था करावी असे निर्देश देण्यात आले आहेत. वैनगंगा व उपनद्यांच्या नदीकिनारी गावांतील नागरिकांनी विशेष सतर्कता बाळगण्याची दक्षता घ्यावी, असे प्रशासनाकडून आवाहन करण्यात येत आहे.