JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / अनलॉक 1 जाहीर केल्यानंतर राज्यातील या शहराने केली 14 दिवसांच्या कडक लॉकडाऊनची घोषणा

अनलॉक 1 जाहीर केल्यानंतर राज्यातील या शहराने केली 14 दिवसांच्या कडक लॉकडाऊनची घोषणा

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव कमी करण्यासाठी पालिकेने कठोर पावले उचलली आहेत.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

वसई-विरार, 19 जून : संपूर्ण राज्यात अनलॉक 1 जाहीर केले असताना लॉकडाउनच्या शिथिलीकरणानंतर आता राज्यात विविध उद्योगधंदे हळू हळू सुरू झाले आहेत. काही भागात होणाऱ्या गर्दीमुळे पुन्हा एकदा कोरोना रुग्णांमध्ये मोठी वाढ होत असल्याचं चित्र आहे. मुंबई, पुण्यासारख्या महत्त्वाच्या शहरांसह इतर शहरांमध्येही कोरोना रुग्णांची वाढती संख्या चिंताजनक ठरत आहे. या पार्श्वभूमीवर काही महापालिकांनी पुन्हा एकदा लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला आहे. वसई-विरार मधील 5 प्रभाग समित्यांमध्ये 14 दिवसांचा लॉकडाऊन जाहीर करून सील करण्यात आले आहेत. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव कमी करण्यासाठी पालिकेने कठोर पावले उचलली आहेत. वसई विरारमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत चालला आहे. हा कोरोना रुग्णांचा आकडा रोखणे पलिकेसमोर मोठे आव्हान ठरतं आहे. महापालिकेने सर्वेक्षण करुन सर्वाधिक रूग्ण व मृत व्यक्ती आढळलेला परिसर प्रतिबंधित करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार आता शहरातील 5 प्रभागात 14 दिवसांची कडक टाळेबंदी लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. गुरुवार 18 जूनपासून ही टाळेबंदी लागू करण्यात आली असून अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार बंद करण्यात आले आहेत. या सर्व बाबींवर पालघर पोलिसांसोबतही चर्चा झाली असून प्रतिबंधित भागात पोलीस तैनात असणार आहे. यावेळी नियम मोडल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे. प्रतिबंधित क्षेत्रात कोणत्या भागाचा समावेश? प्रभाग समिती सी- चंदनसार गांधी चौक विरार पूर्व ( गांधी चौक ते जनकधामपूपर्यंत) सहकारनगर (विठुरमाळी कंपाऊंड ते मथुरा डेअरी) प्रभाग समिती    एफ- धानीव-पेल्हार श्रीरामनगर गेट नंबर 1 ते डोंगपाडा रोड धानीवबाग नाका ते वेलकम डेअरी संतोष भुवन वाकणपाडा वसई फाटा येथील इंदिरा वसाहत, मिल्लतनगर प्रभाग समिती   डी- आचोळे गालानगर (लक्ष्मण अपार्टमेंट ते आनंद वैभव इमारत) शिर्डीनगर (सीमा इमारत ते ख्रिस्तराज अपार्टमेंट) प्रभाग समिती   जी- वालीव तुंगार फाटा ते बाप्पा सीताराम मंदिरापर्यंत फादरवाडी नाका ते विद्यविकासिनी शाळा गणेश माळी यांचे घर ते भगत कंपाऊंड. प्रभाग समिती बी रहमत नगर, अन्सारी नगर लक्ष्मी नगर ओम नगर संपादन - अक्षय शितोळे

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या