गोविंद वाकडे (प्रतिनिधी) देहू, 23 जून: पुण्यापासून अवघ्या 20 किलोमीटर अंतरावर उत्तराभिमुख वाहणाऱ्या इंद्रायणी नदीच्या तिरावर ,13 व्या शतकात वसलेल हे टूमदार देहू नगर, जे तीर्थक्षेत्र म्हणूनही ओळखल जाते तिथे जगदगुरू संत तुकाराम महाराजांचा जन्म झाला. आणि पुढे हेच देहू, वारकरी सांप्रदायसाठी आचार, विचार , आणि प्रबोधनाच् केंद्र म्हणून उदयास आलं. देहू नगरीच पहिल वैशिष्ट्य सांगायच झाल तर, पूर्वी म्हणजे अगदी पंढरपुरच्याही आधी ,विठ्ल रुक्मिणीची एकत्रित उभी असलेली मूर्ती.16 व्या शतकात तुकोबांचा जन्म ह्या नगरीत झाला आणि महाराजांनी वारकरी सांप्रदायाची पताका खांद्यावर घेत हा भक्तिमळा फुलवला