औरंगाबाद, 17 मे: शहरासह जिल्ह्यात कोरोनानं थैमान घातलं आहे. कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 958 वर पोहोचली असताना प्रशासन हादरलं आहे. त्यातच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. औरंगाबाद मध्यवर्ती कारागृहात एका तरुण कैद्यावर अनैसर्गिक अत्याचार झाल्याचं समोर आलं आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. **हेही वाचा..** औरंगाबादेत कोरोनाचा उद्रेक, 14 तासात 3 जणांचा मृत्यू तर रुग्णांची संख्या 958 वर! नेमकं काय आहे प्रकरण? औरंगाबाद शहरातील हर्सूल मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या एका कैद्याने त्याच्या बॅरेकमधील 23 वर्षीय तरुण कैद्यासोबत 25 एप्रिलला अनैसर्गिक कृत्य केलं. ही घटना कारागृहातील बॅरेक क्रमांक 6 मध्ये घडली. या प्रकरणी आरोपी नागनाथ सोनटक्के यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेली माहिती अशी की, पीडित कैदी बीड येथीर रहिवासी असून तो एका गुन्ह्यात शिक्षा भोगत आहे. आरोपी नागनाथ सोनटक्के आणि पीडित तरुण कारागृहात एकाच बॅरेकमध्ये राहात होते. पीडित तरुण रात्री लघुशंकेसाठी उठला होता. त्यावेळी आरोपी सोनटक्केही त्याच्या मागे गेला. तुला बॅरेक बदलून देतो, असं सोनटक्के यानं तरुण कैद्याला आमिष दाखवलं. नंतर त्याला बॅरेकमध्ये नेऊन त्याच्यासोबत अनैसर्गिक कृत्य केलं. एवढंच नाही तर हा प्रकार कोणाला सांगितल्यास त्याला जीवे मारण्याची धमकी दिले. धक्कादायक म्हणजे, या घटनेनंतर आरोपी सोनटक्के याने आणखी तीन ते चार वेळा पीडित कैद्यावर अनैसर्गिक अत्याचार केला. हेही वाचा.. कांद्याला जीवनावश्यक वस्तूत टाकणारा महामुर्ख कोण? मंत्र्यांचा मोदींवर निशाणा अखेर या घृणास्पद कृत्याला कंटाळून पीडित कैद्यानं तुरुंग अधिकाऱ्यासमोर आपबिती कथन केली. पीडित तरुणाच्या तक्रारीवरुन आरोपी नागनाथ सोनटक्के याच्याविरुद्ध हर्सूल पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाची पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक नितीन कामे करत आहेत.