अत्याचार करणारा मामा हा पीडित कुटुंबीयांच्या शेजारी राहतो. तो पीडित चिमुरडीला त्यांच्यासोबत खेळण्याच्या बहाण्याने घरी घेऊन जात होता.
उल्हासनगर, 18 सप्टेंबर : उल्हासनगरमध्ये (Ulhasnagar ) रेल्वे स्टेशन परिसरात एका 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्काराची (rape) घटना ताजी असताना आणखी एका अल्पवयीन मुलीवर अत्याचाराची घटना समोर आली आहे. एका मामाने आपल्या भाचीवर अत्याचार केल्याची संतापजनक घटना घडली आहे. पोलिसांनी (ullhasnagar police) या नराधम मामाला अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मामा भाचीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना उल्हासनगरमध्ये घडली आहे. एका 6 वर्षाच्या चिमुरडीवर मामानेच अत्याचार केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी मुलीच्या आईच्या फिर्यादीवरून उल्हासनगर हिल लाईन पोलीस ठाण्यात लहान बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण म्हणजे पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला पोलिसांनी अटक देखील केली आहे. हा VIDEO पाहून PMही सुन्न होतील;बापाच्या हत्येनंतर 4 वर्षांच्या लेकराची आर्त हाक अत्याचार करणारा मामा हा पीडित कुटुंबीयांच्या शेजारी राहतो. तो पीडित चिमुरडीला त्यांच्यासोबत खेळण्याच्या बहाण्याने घरी घेऊन जात होता. यावेळी पीडितेवर वारंवार अत्याचार करत होता. तीन दिवसांपूर्वी पीडित मुलीच्या मोठ्या भावाने तिच्यावर अत्याचार करताना या मामाला पाहिले. त्यानंतर त्याने तत्काळ त्याच्या आईला घटनेची माहिती दिली. पीडित मुलीच्या आईने तात्काळ हिललाईन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आणि गुन्हा दाखल केला. आरोपी मामाला अटक केली करून न्यायालयात हजर केले असता त्याला ४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या कारणासाठी भारतीय सर्वाधिक वापरतात YouTube, हैराण करणारा डेटा आला समोर या घटनेमुळे उल्हासनगरमध्ये खळबळ उडाली आहे. या आरोपीला लवकर लवकरात कठोर शिक्षा द्यावी, अशी मागणी पीडितेच्या नातेवाईकांनी केली आहे.