JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Uddhav Thackeray : 'ते आले, त्यांनी पाहिलं, पण त्यांना...', ठाकरेंच्या मराठवाडा दौऱ्यावर शिंदे गटाचा प्रहार

Uddhav Thackeray : 'ते आले, त्यांनी पाहिलं, पण त्यांना...', ठाकरेंच्या मराठवाडा दौऱ्यावर शिंदे गटाचा प्रहार

अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतीच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी उद्धव ठाकरे मराठवाड्यात आले होते, यावरून शिंदे गटाने टीका केली आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 23 ऑक्टोबर : परतीच्या पावसामुळे मराठवाड्यामध्ये शेतीचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. या नुकसानीची पाहणी करण्यासाठी उद्धव ठाकरे औरंगाबादमध्ये आले होते. दहेगाव आणि गंगापूर परिसरातील गावांची त्यांनी पाहणी केली. उद्धव ठाकरेंच्या या दौऱ्यावर एकनाथ शिंदे यांच्या बाळासाहेबांची शिवसेना पक्षाकडून टीका करण्यात आली आहे. शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्यावर निशाणा साधला. ‘ते आले, त्यांनी पाहिलं, पण त्यांना त्यातलं किती समजलं माहिती नाही, कारण त्यांचा हा दौरा तासभरच होता. शरद पवार उद्धव ठाकरेंना म्हणाले होते, त्यांना बटाटे जमिनीवर लागतात का जमिनीखाली हे माहिती नाही. त्यांना शेतीतील काय कळणार? असे सूचक उद्गार पवारांनी उद्धव ठाकरेंबद्दल काढले होते,’ असा टोला नरेश म्हस्के यांनी लगावला.

संबंधित बातम्या

‘बांद्र्यावरून ते बांधावर कधी पोहोचले कळलंच नाही. याआधी कधी मातोश्रीमधून, वर्षामधून बाहेर पडलेत का? मुख्यमंत्री असताना 25 हजार रुपये शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन देतो म्हणाले होते, पण याआधी कधी ते शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचले का?’ असा सवालही नरेश म्हस्के यांनी विचारला. ‘ही शिल्लक सेना वाचवण्यासाठी आणि काम करणाऱ्या सरकारवर टीका करण्यासाठी संभाजीनगरचे लोकप्रतिनिधी शिंदेंसोबत आहेत, त्यांना डिस्टर्ब करण्यासाठी हा दौरा काढण्यात आला,’ असा आरोप नरेश म्हस्के यांनी केला आहे. ’…तेव्हा मी आणि मोदी घरातच होतो,’ भाजप-शिंदेंच्या टीकेवर उद्धव ठाकरेंचा पलटवार

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या