मुंबई, 01 ऑगस्ट: शिवसेना भवन (Shivsena Bhavan) फोडू म्हणणाऱ्या प्रसाद लाड यांच्या वक्तव्यावर उच्च तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आम्ही भाजपच्या (bjp) कार्यक्रमला आलोय. यांना वाटतंय की शिवसेना भवन (Shiv Sena Bhavan) तोडायला आले की काय? जर अंगावर आले तर शिवसेना भवन ही तोडू असं थेट वक्तव्य भाजपचे आमदार प्रसाद लाड (prasad lad) यांनी केलं. ही तर भाजपच्या पुढाऱ्यांची राजकीय विचारांची दिवाळखोरी असल्याची प्रतिक्रिया उदय सामंत यांनी दिली आहे. शिवसेना भवन फोडू म्हणणाऱ्या भाजपच्या काही पुढाऱ्यांच्या राजकीय विचारांच्या दिवाळखोरीच उत्तर महाराष्ट्रातील जनता नक्की निवडणुकीत यांना भुईसपाट करून देईल. वंदनीय बाळासाहेबांचं शिवसेना भवन हे महाराष्ट्रासाठी भूषण असल्याचं उदय सामंत यांनी म्हटलं आहे. प्रसाद लाड यांनी शिवसेना भवन फोडू असे वक्तव्य केले त्यावर सामंत या प्रतिकिया दिली आहे. भाजप आमदार प्रसाद लाड काय म्हणाले भाजप पदाधिकारीच्या कार्यक्रमासाठी प्रसाद लाड माहिममध्ये आले होते. गेल्या महिन्यात शिवसेना भवनावर माहिम येथील भाजप कार्यकर्त्यांनी आंदोलन केले होतं. कार्यकर्त्यांशी बोलत असताना वेळ आली तर मुंबईतील शिवसेना भवन फोडू असं वादग्रस्त विधान त्यांनी केलं. यावेळी आमदार नितेश राणे देखील उपस्थित होते. जगभरातल्या कोट्यवधी गणेशभक्तांसाठी आनंदाची बातमी आम्ही भाजपच्या कार्यक्रमला आलोय. यांना वाटतंय की शिवसेना भवन तोडायला आले की काय? जर अंगावर आले तर शिवसेना भवन ही तोडू , असं वक्तव्य त्यांनी केलं. आशिष शेलार, नितेश राणे, प्रवीण दरेकर असतील किंवा मी असेल, आता यापुढे जे बालेकिल्ला बालेकिल्ला म्हणत आहे ते पाडण्याचे काम आम्ही करणार आहोत. कारण किल्ले फक्त शिवाजी महाराज यांचे आहे. आता यांचे किल्ले आम्ही पाडणार आहोत, बालेकिल्ला वगैरे काही नाही, असंही लाड म्हणाले. त्यावेळी जो भाजपचा मतदारसंघ होता, तो अजूनही आपल्यासोबत कायम आहे. आता तर नारायण राणे आणि राणे कुटुंबाला माणणारा मोठा वर्ग भाजपसोबत आला आहे. त्यामुळे पुढच्यावेळी नितेशजी आपण कार्यकर्ते कमी आणू, कारण आपण आलो की, पोलीसच पुढे येतात. त्यामुळे त्यांना ड्रेसमध्ये येऊ नका असं सांगूया, म्हणजे, ते हॉलमध्ये तरी बसतील. कारण, एवढी त्यांना भीती आहे की, आम्ही माहीममध्ये आलो तर शिवसेना भवन फोडून काढतील. काय घाबरू नका, वेळ आली तर ते देखील करू, असं चिथवणीखोर वक्तव्य प्रसाद लाड यांनी केलं होतं.