मुंबई, 9 सप्टेंबर : पत्नीच्या घरच्यांकडून पैसे आण नाही तर तुला TALAK देऊन तुझ्या बलात्काराचे VIDEO व्हायरल करतो, अशी धमकी देणाऱ्या एकाला मुंबई पोलीसांनी बेड्या ठोकल्या आहेत. त्यामुळे आता (Triple talaq) चा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. घटनेबाबत अधिक माहिती अशी की मुंबईतील देवनार परिसरातील एका महिलेने आपल्या पतीविरोधात मारहाण आणि तलाक देण्याच्या धमकीविरूद्ध गुन्हा दाखल केला होता. त्यावेळी पोलिसांनी ही कारवाई केली आहे. मिळालेल्या अधिक माहितीनुसार तलाक देणारा पती हा सातत्याने आपल्या पत्नीकडे 5 लाखांची मागणी करत होता. त्याने ही मागणी मान्य झाली नाही तर तलाक देण्याची आणि त्याचबरोबर पत्नीच्या बलात्काराचे VIDEO सोशल मिडीयावर टाकण्याची धमकीसुद्धा दिली होती. पिडीत महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी त्याला अटक करण्यासाठी छापा टाकला तेव्हा तो मुंबई सोडून उत्तर प्रदेशातील आपल्या गावी श्रावस्तीला पसार झालेला होता. त्यावेळी पोलिसांनी त्याला यूपीतून बेड्या ठोकल्या आहेत. पुण्यात स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थिनीकडून बॉयफ्रेंडचा खून पीडित महिलेने पोलिसांना दिलेल्या तक्रारीनुसार तिचा पती तिला पैशांसाठी BLACKMAIL करत होता. त्याचबरोबर तिच्या घरच्यांकडून पैशांची मागणी करत होता. त्यामुळे आता त्याच्याविरोधात TRIPAL TALAK कायद्यानुसार कारवाई होण्याची शक्यता आहे. पोलीसांनी त्याला उत्तर प्रदेशातून अटक केली असून आता त्याच्यासोबत असणाऱ्या आणि त्याला या प्रकरणात साथ देणाऱ्या इतर दोेघांनीही गजाआड करण्यात आले आहे. या पिडीतेच्या पतीला अटक करण्यात आली असून पुढील तपास देवनार पोलीस करत आहेत.