JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / ट्रॅव्हल्स बस आणि पिकअप व्हॅनची समोरासमोर धडक, 3 जण जागीच ठार

ट्रॅव्हल्स बस आणि पिकअप व्हॅनची समोरासमोर धडक, 3 जण जागीच ठार

हा अपघात इतका भीषण होता की, यात पिकअप व्हॅनचा चक्काचूर झाला आहे.

जाहिरात

हा अपघात इतका भीषण होता की, यात पिकअप व्हॅनचा चक्काचूर झाला आहे.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नाशिक, 09 जून :  नाशिक सापुतारा रोडवर (Nashik Saputara Road) खासगी बस (Travels bus) आणि पिकअप व्हॅनमध्ये भीषण अपघात घडला आहे. या अपघातात 3 जण जागीच ठार झाले आहे.  पीक अप व्हॅन आणि खासगी बसची समोरासमोर धडक झाली.  या अपघातात जखमी झालेल्या प्रवाशांना तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अधिक माहिती अशी की, बोरगाव सापुतारा महामार्गावरील चिखली तालुका सुरगाणा येथे वनीकडून सापुताराकडे  खासगी ट्रॅव्हल्सची बस  RJ 27 2658 जात होती. तर बोरगावकडून नाशिककडे जाणारी महिंद्रा पिकप MH 41 AU 21 92 यांच्यात समोसमोर समोर धडक झाली. हा अपघात  सायंकाळी पाच ते साडेपाच या दरम्यान घडला. हा अपघात इतका भीषण होता की, यात पिकअप व्हॅनचा चक्काचूर झाला आहे. धडक बसल्यानंतर पिकअप व्हॅन पुन्हा विरुद्ध दिशेनं वळाली. तर बसच्या समोरील भागाचे प्रचंड नुकसान झाले आहे. ( मालिकेतून एक्झिट घेतल्यानंतर अभिनेत्रीची पहिली पोस्ट; भावूक होत म्हणाली… )टअपघात झाला यात पिकप वाहनातील तीन जण कैलास पांडुरंग दळवी (वय 26 राहणार ततानी तालुका कळवण) पंढरीनाथ मुरलीधर, नारायण देवराम पवार (वय 50) हे तीन जण जागीच ठार झाले. तर भास्कर पांडुरंग राऊत (27 राहणार ततानी तालुका कळवण), सुनील पुंडलिक बागुल, किशोर साबळे, सावळीराम बबन साबळे, यशवंत महादू गायकवाड, यशवंत सोमा राऊत या जखमींना बोरगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले होते. परंतु सावळीराम साबळे व यशवंत गायकवाड यांची परिस्थिती चिंताजनक असल्याने त्यांना नाशिक जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहेत. याबाबत सुरगाना पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद झाली असून पुढील तपास पोलिस निरीक्षक संदीप कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली  सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश बोडखे संतोष गवळी पराग गोतरणे अधिक करीत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या