JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Shivsena VS Shinde : 'धनुष्यबाण' आधी शिवसेनेकडे नव्हते, असे मिळवले निवडणूक चिन्ह !

Shivsena VS Shinde : 'धनुष्यबाण' आधी शिवसेनेकडे नव्हते, असे मिळवले निवडणूक चिन्ह !

शिवसेनेनं ढाल-तलवार आणि इंजिन अशा चिन्हावर निवडणूक लढवली होती. नंतर शिवसेनेकडे धनुष्यबाण चिन्ह आलं.

जाहिरात

शिवसेनेनं ढाल-तलवार आणि इंजिन अशा चिन्हावर निवडणूक लढवली होती. नंतर शिवसेनेकडे धनुष्यबाण चिन्ह आलं.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 09 ऑक्टोबर : अंधेरी पोटनिवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेचे निवडणूक चिन्ह धनुष्यबाण गोठवण्यात आल्यामुळे मोठा धक्का बसला आहे. पण, पक्ष जेव्हा स्थापन झाला होता तेव्हा शिवसेनेकडे धनुष्यबाण चिन्ह नव्हते. शिवसेनेनं ढाल-तलवार आणि इंजिन अशा चिन्हावर निवडणूक लढवली होती. नंतर शिवसेनेकडे धनुष्यबाण चिन्ह आलं. बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची स्थापना केली. त्यावेळी जवळपास पुढील दोन दशकं शिवसेनाही वेगवेगळ्या चिन्हावर निवडणूक लढवत होती. शिवसेनेचे उमेदवार हे कधी अपक्ष, तर कधी ढाल-तलवार, इंजिन या चिन्हावर निवडणूक लढवत होते. मात्र, 1968 रोजी मुंबई मुंबई महापालिका निवडणुकीच्या वेळी शिवसेनेनं एक मिरवणूक काढली होती. यामध्ये शिवसैनिक लहू आचरेकर हे प्रभू श्रीराम बनले होते, त्यामुळे त्यांच्या हातात ताणलेला धनुष्यबाण होता. त्यांच्यासोबत ऑर्थर डिसुझा हा कार्यकर्ता लक्ष्मण बनला होता. त्यांच्याही हाताच धनुष्यबाण होते, अशी माहिती ज्येष्ठ पत्रकार कुमार कदम यांनी दैनिक लोकमतशी बोलताना दिली. त्यामुळे पुढे धनुष्यबाण हे चिन्ह शिवसेनेचं समिकरण बनलं. दोन दशकानंतर शिवसेनेला अधिकृत चिन्ह मिळालं. मागील तीन ते साडेतीन दशकं शिवसेनेकडे हे चिन्ह होतं. पण, आता शिवसेनेमध्ये बंडखोरी झाली आणि अंधेरी पोटनिवडणुकीच्या तोंडावर धनुष्यबाण चिन्ह गोठवले गेले. दरम्यान, निवडणूक आयोगाने शिवसेनेचे पक्षचिन्ह धनुष्यबाण चिन्ह गोठवलं आहे. शिवसेना आणि एकनाथ शिंदे पक्षांना धनुष्यबाणाऐवजी मुक्त चिन्हांपैकी एखादे चिन्ह घेता येईल. शिवसेना नाव वापरता येईल परंतु, त्याला काही जोडावे लागेल, अशी माहिती शिवसेनेच्या नेत्या नीलम गोऱ्हे यांनी दिली. (बाळासाहेबांसारखा कणखर आवाज, एकनाथ शिंदेंना चॅलेज देणार हा तिसरा ठाकरे?) तसंच, शिवसेना नावासमोर आता दुसरे एखादे सुटसुटीत नाव जोडावे लागणार आहे. धनुष्यबाण गोठवण्याचा निर्णय हा तात्पुरता आहे. चिन्हाबाबत अंतिम निवाडा होईपर्यंत हा निर्णय लागू हे आयोगानं म्हटलं आहे. अंतिम निवाडा कधी ते पुढील काळात ठरणार आहे, असंही नीलम गोऱ्हे यांनी म्हटलं आहे. ( मुंबईत बनावट शपथपत्रांचा मोठा घोटाळा, ठाकरेंना आणखी एक धक्का? ) केंद्रीय निवडणूक आयोगाकडे सध्याच्या घडीला 197 फ्री निवडणूक चिन्ह आहेत. शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि शिंदे गटाला यापैकी तीन चिन्हाचा पर्याय दिला जावू शकतो. आता दोन्ही गट कोणते चिन्ह घेतात हे सोमवारी समोर येणार आहे. दोन्ही त्यांना हवे असल्यास, त्यांच्या मूळ पक्षाशी जोडणारं चिन्ह निवडू शकतात. सध्याच्या पोटनिवडणुकासाठी त्यानुसार, दोन्ही गटांना याद्वारे 10 ऑक्टोबर 2022 दुपारी 01:00 पर्यंत सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. केंद्रीय निवडणूक आयोगाचा आदेश : 1) दोन गटांपैकी कोणीही शिवसेना हे नाव वापरू शकणार नाही. २) दोन्ही गटांपैकी कोणालाही “धनुष्य आणि बाण” हे चिन्ह वापरण्याची परवानगी दिली जाणार नाही. 3) दोन्ही गट त्यांच्यासाठी निवडतील अशा नावांनी ओळखले जातील. संबंधित गट, त्यांना हवे असल्यास, त्यांच्या मूळ पक्षाशी जोडणारं चिन्ह निवडू शकतात. 4) दोन्ही गटांना ते निवडतील अशी वेगवेगळी चिन्हे देखील दिली जातील. यासाठी निवडणूक आयोगाने अधिसूचित केलेल्या मुक्त चिन्हांच्या यादीतून निवड करावी लागेल. सध्याच्या पोटनिवडणुकासाठी त्यानुसार, दोन्ही गटांना याद्वारे 10 ऑक्टोबर 2022 दुपारी 01:00 पर्यंत सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. (i) त्यांच्या गटांची नावे ज्याद्वारे त्यांना आयोगाने मान्यता दिली असेल आणि यासाठी, प्राधान्य क्रमाने तीन पर्याय द्या, त्यापैकी कोणीही असू शकतो आयोगाने मंजूर केलेले आणि; (ii) उमेदवारांना जे चिन्ह वाटप केले जाऊ शकतात, जर असतील तर संबंधित गट. ते मध्ये तीन मुक्त चिन्हांची नावे सूचित करू शकतात. त्यांच्या पसंतीचा क्रम, त्यापैकी कोणालाही त्यांच्या उमेदवारांना वाटप केले जाऊ शकते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या