ठाणे, 29 फेब्रुवारी : राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला असताना आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. न्यायबंदी असलेला कैदी चालू गाडीत पोलीस हवालदारावर थुंकल्या प्रकार घडला आहे. तसंच या कैद्याने हवालदाराला लाथ मारली आणि त्याच्या करंगळीला चावून जखमीही केले आहे. ठाण्यातील मोहम्मद अंसारी म्हणून न्यायबंदी असलेल्या आरोपीला मुंबईतील दिंडोशी कोर्टात नेले होते. तिथून परत येताना या कैद्याने पोलिसांसोबत गैरवर्तन केल्याचा हा प्रकार घडला. नातेवाईंकांनी आणलेले जेवण देण्यास मनाई केल्याने कैदीने हा घृणास्पद प्रकार केल्याचं बोललं जात आहे.
पोलिसांच्या अपमान करणारी ही घटना समोर आल्यानंतर सर्वसामान्यांकडून मोठा संताप व्यक्त करण्यात येत आहे. रक्षणकर्त्या पोलिसांना एखाद्या कैद्याकडून अशी वागणूक दिली जात असेल तर सर्वसामान्यांचं काय, अशी विचारणा आता केली जात आहे. ST बस थेट नाल्यात जाऊन धडकली, चालकाचे नियंत्रण सुटल्याने भीषण अपघात दरम्यान, एकीकडे ठाण्यात पोलीस हवालदारासोबत हा प्रकार घडलेला असताना दुसरीकडे नागपूरमध्ये तर थेट पोलीस हेड कॉन्स्टेबलच्या हत्येचा प्रयत्न करण्यात आल्याची घटना घडली आहे. नागपूरच्या सक्करदरा पोलीस ठाण्याच्या वाहतूक शाखेतील हेड कॉन्स्टेबल सुभाष लांडे यांच्या हत्येचा प्रयत्न करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. त्यांच्या अंगावर आरोपीने सवारी व्हॅन वाहन घालून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला. मात्र, सुदैवाने ते थोडक्यात बचावले. भर रस्त्यात झालेल्या या हल्ल्यात हेड कॉन्स्टेबल सुभाष लांडे यांच्या पायाला सहा टाके लागले आहेत. दोन दिवसांपूर्वी आरोपीवर अवैध प्रवासी वाहतूक करण्याच्या गुन्ह्याखाली कारवाई करण्यात आली होती. त्यावेळी आरोपीनं हेड कॉन्स्टेबल सुभाष लांडे यांना बघून घेण्याची धमकी दिली होती. कारवाईचा राग मनात धरून आरोपीनं हेड कॉन्स्टेबल लांडे यांच्या अंगावर वाहन घालून त्यांना ठार मारण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी दोनपैकी एका आरोपीला अटक केली आहे.