गणेश गायकवाड (ठाणे) 13 नोव्हेंबर : ठाणे जिल्ह्यात मागच्या कित्येक दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनेत वाढ होताना दिसत आहे. मागच्या काही दिवसांपूर्वी ठाण्यात गोळीबारातून एकाचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच आता नवीन माहिती समोर आली आहे. ठाण्याच्या अंबरनाथ एमआयडीसी भागात दोन गटात गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. एका गटाने पहिल्यांदा गोळीबार केल्याने प्रत्त्युत्तरादाखल दुसऱ्या गटानेही गोळीबार केल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे ठाणे जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ एमआयडीसी भागात हा गोळीबार झाल्याची माहिती मिळते आहे. दोन गटांमध्ये वाद होऊन त्यांनी एकमेकांवर हा गोळीबार करण्यात आला आहे. राहुल पाटील हे आपल्या कारमध्ये बसले असता त्यांच्या कारवर फडके गटाने गोळीबार केला. यावेळी पाटील यांच्या गटाने देखील दुसऱ्या गटावर गोळीबार केला.
हे ही वाचा : मित्राच फोन येताच घराबाहेर पडला अन्…, वाढदिवसाच्या दिवशीच बुलडाण्यातील तरुणाचा हृदयद्रावक शेवट
यामध्ये नऊ राऊंड फायर झाल्याची माहिती मिळत असून या घटनेत कोणीही जखमी नसल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.बैलगाडा शर्यतीच्या वादातून हा गोळीबार झाल्याची माहिती समोर येतीय.दरम्यान सध्या अंबरनाथ शिवाजीनगर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहे.यामध्ये नक्की गोळीबार कोणत्या कारणाने झाला याचा तपास केला जातोय.
पनवेलमधील पंढरी फडके आणि कल्याणचे राहुल पाटील ही दोन नावे बैलगाडा शर्यतीत नेहमीच चर्चेत राहिले आहेत. गेल्या वर्षीचा मोसमात या दोन्ही गटातील बैलगाड्यांना प्रवेश नाकारण्यात आला होता. हे दोन्ही गट एकमेकांच्या विरोधात जाण्याची शक्यता असल्यामुळे ही दक्षता बाळगण्यात आली होती. मात्र आता बैलगाडा शर्यती पुन्हा सुरू झाल्याने हे दोन गट पुन्हा एकमेकांच्या समोर उभे ठाकले आहेत.
हे ही वाचा : Beed Crime : इलेक्ट्रीक बाईकची डिलरशीप देण्याच्या नावाखाली बनवाबनवी लाखोंना घातला गंडा
बैलगाडा शर्यती संदर्भात बोलवण्यात आलेला बैठकीत फडके आणि राहुल पाटील गटात मोठ्या प्रमाणात वाद सुरू झाले. त्यातूनच फडके गटाने पाटील गटावर अंदाधुंद गोळीबार केला. अंबरनाथच्या एमआयडीसीतील सुदामा हॉटेलजवळ गोळीबाराची ही घटना घडली. यामध्ये काही गोळ्या झाडण्यात आल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे. या प्रकरणाची माहिती मिळताच शिवाजीनगर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. ही घटना कळताच राहुल पाटील यांचे शेकडो समर्थक घटनास्थळी पोहोचले.