मुंबई, 27 मे: वांद्रे रेल्वे स्थानकावर टीसीची प्रवाशांसोबत दादागिरी समोर आली आहे. विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशाला दंड भरायला सांगितला. दंड भरूनही टीसी सोडायला तयार नसल्यानं शाब्दिक बाचाबाची झाली. तिथे दोघांनीही एकमेकांना शिवीगाळ करत कानशिलात लगावली. तर या प्रकरणी टीसी दीपक राणे यांना निलंबित करण्यात आलं आहे.