JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / संजय राऊतांच्या अडचणीत वाढ, महिलेला शिवीगाळ प्रकरण भोवणार?

संजय राऊतांच्या अडचणीत वाढ, महिलेला शिवीगाळ प्रकरण भोवणार?

अर्वाच्च भाषेत शिवीगाळ आणी धमकी प्रकरणात संजय राऊत आता पुन्हा एकदा गोत्यात सापडले आहे.

जाहिरात

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 27 ऑगस्ट : पत्राचाळ प्रकरणामुळे शिवसेनेचे खासदार संजय राऊत (sanjay raut) हे आर्थर रोड जेलमध्ये मुक्कामी आहे. पण आता महिलेला शिवीगाळ केल्या प्रकरणी राऊतांच्या अडचणीत वाढ होण्याची चिन्ह आहे. शिवीगाळ प्रकरणी स्वप्ना पाटकर (Swapna Patkar) यांचा नव्याने जबाब नोंदवला जाणार आहे. अर्वाच्च भाषेत शिवीगाळ आणी धमकी प्रकरणात संजय राऊत आता पुन्हा एकदा गोत्यात सापडले आहे. स्वप्ना पाटकर यांनी संजय राऊत यांच्याविरोधात दाखल प्रकरणात पोलिसांचा तपास सुरू केला आहे. आज स्वप्ना पाटकर यांचा पुन्हा नव्यानं जबाब नोंदवला जाणार आहे. वाकोला पोलीस ठाण्यात स्वप्ना पाटकर दाखल झाल्या आहेत. वरीष्ठ अधिकारी, या प्रकरणी चौकशी करू शकतात, त्यामुळे राऊत यांच्या अडचणीत वाढ होण्याची चिन्ह आहे. सोशल मीडियावर मागील महिन्यात फोनवरील संभाषणाची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. या ऑडिओक्लिपमध्ये एक व्यक्ती महिलेला शिवीगाळ करताना दिसत आहे. या ऑडिओक्लिपमधला आवाज हा संजय राऊत यांचाच असल्याचा दावा भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. त्यामुळे पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घ्यावी आणि राऊतांवर कारवाई व्हावी, अशी मागणी किरीट सोमय्या यांनी केली होती. त्यानुसार संजय राऊत यांच्याविरोधात आयपीसी 507 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कथित ऑडिओ क्लिपची राज्य सरकारकडून दखल दरम्यान, संजय राऊत यांच्या आवाजाच्या कथित ऑडिओ क्लिपची राज्य सरकारने देखील दखल घेतली आहे. पोलीस विभागाने या घटनेची गंभीरतेने दखल घेण्याचे राज्य सरकारचे आदेश दिले आहे. समाज माध्यमांमध्ये फिरत असलेल्या ऑडिओ क्लिपची राज्य सरकारकडून गंभीर दखल घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 70 सेकंदाची ऑडिओ क्लिप आहे. काही वृत्तवाहिन्यांवर आणि समाजमाध्यमांमध्ये क्लिप दाखवण्यात आली आहे. संजय राऊत आणि स्वप्ना पाटकर यांच्यातील हा संवाद असल्याचा दावा करण्यात आला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या