JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / चिंताजनक! देशात आत्महत्येचं प्रमाण वाढलं; 55 वर्षांतील सर्वाधिक आत्महत्यांची नोंद 2021 मध्ये, महाराष्ट्र अव्वल

चिंताजनक! देशात आत्महत्येचं प्रमाण वाढलं; 55 वर्षांतील सर्वाधिक आत्महत्यांची नोंद 2021 मध्ये, महाराष्ट्र अव्वल

देशात 1967 नंतर पहिल्यांदाच सर्वाधिक आत्महत्यांची नोंद करण्यात आली आहे. गेल्या वर्षी दर 10 लाख लोकसंख्येमागे 120 जणांनी आत्महत्या केल्या होत्या. हा दर 2020 च्या तुलनेत 6.1 टक्क्यांनी जास्त आहे. (India Suicide Rate)

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई 30 ऑगस्ट : मागची दोन वर्षे ही कोरोनाच्या (Corona) सावटाखाली गेली. या काळात कोरोनामुळे अनेकांना प्राण गमवावे लागले. या भयंकर साथीच्या रोगामुळे लोकांनी फक्त जवळचे लोकच गमावले नाहीत, तर नोकरी (Job) आणि पैसाही (Money) गमावला. रोजंदारीवर काम करणाऱ्या लोकांना तर उपासमार सहन करावी लागली. उद्योगधंदे बंद झाल्याने लोकांच्या हाताला काम नव्हतं, अशातच या भयंकर साथीच्या रोगाचा सामना करावा लागला. अनेकांचे उपासमारीने जीव गेलेत, तर अनेकांनी हाताला काम नसल्याच्या आणि नोकरी गेल्याच्या तणावातून कोरोना काळात आत्महत्या (Suicide) केल्या. या दोन वर्षांतील आत्महत्यांची आकडेवारी ही मागच्या जवळपास 55 वर्षांनंतर सर्वाधिक आहे. देशात 1967 नंतर पहिल्यांदाच सर्वाधिक आत्महत्यांची नोंद करण्यात आली आहे. गेल्या वर्षी दर 10 लाख लोकसंख्येमागे 120 जणांनी आत्महत्या केल्या होत्या. हा दर 2020 च्या तुलनेत 6.1 टक्क्यांनी जास्त आहे. यापूर्वी 2010 मध्ये सर्वाधिक आत्महत्यांची नोंद करण्यात आली होती. तेव्हा दर 10 लाख लोकांमागे 113 जणांनी आत्महत्या केल्या होत्या. नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोने (NCRB) जारी केलेल्या ताज्या आकडेवारीतून ही बाब समोर आली आहे. या संदर्भात लाइव्ह हिंदुस्थानने वृत्त दिलंय. देशात 2021 मध्ये सर्वाधिक आत्महत्या (Suicides) महाराष्ट्रात झाल्या आहेत. आत्महत्येच्या बाबतीत तामिळनाडू आणि मध्य प्रदेश दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर आहेत मुस्लीम पत्नीने जबरदस्तीने गोमांस खाऊ घातल्याने हिंदू पतीची आत्महत्या, आता पोलिसांनी उचललं मोठं पाऊल आत्महत्या करणाऱ्यांमध्ये कमी उत्पन्न असलेल्या लोकांचा समावेश जास्त आहे, असं आकडेवारीवरून दिसून येतंय. एकूण आत्महत्येच्या प्रकरणांपैकी दोन तृतीयांश लोक वार्षिक 1 लाख रुपयांपेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या वर्गातील आहेत. याशिवाय 2021 मध्ये लहान व्यापारी आणि रोजंदारीवर पोट भरणाऱ्या लोकांच्या आत्महत्येच्या घटनांमध्येही वाढ झाली आहे. त्यापाठोपाठ नोकरी शोधणाऱ्या आणि विद्यार्थ्यांचा (Students) क्रमांक लागतो. गुन्ह्यांचं प्रमाणही वाढलं कोरोना महामारीशी संबंधित प्रकरणं वगळल्यास 2019 आणि 2020 या दोन्ही वर्षांच्या तुलनेत 2021 मध्ये गुन्ह्यांमध्ये झपाट्याने वाढ झाली आहे, असं आकडेवारीवरून दिसून येतं. महामारीशी संबंधित गुन्ह्यांव्यतिरिक्त 2020 मध्ये 46 लाख आणि 2021 मध्ये 50 लाख गुन्हे दाखल झाले होते. 2021 मध्ये लॉकडाउनचे (Lockdown) नियम शिथिल केल्यानंतर गुन्ह्यांमध्ये घट नोंदवण्यात आली होती. 2020 मधील 66 लाख गुन्हे दाखल झाले होते, तेच 2021 मध्ये 61 लाखांवर गुन्हे दाखल झाले. त्याचबरोबर कोरोना काळात निर्बंध शिथिल केल्यामुळे अपघातांचे प्रमाणही वाढले. 2021 मध्ये अपघातात जीव गमावणाऱ्यांची 3.74 लाखांवरून 3.97लाख झाली होती. याशिवाय इतर कारणांमुळे होणाऱ्या अपघातांमध्येही मृत्यूचं प्रमाण वाढलं होतं. आकस्मिक मृत्यू कमी 2020 च्या तुलनेत 2021 मध्ये भूकंप, पूर किंवा उष्णतेमुळे झालेल्या आकस्मिक मृत्युंची नोंद खूप कमी झाली आहे. 2020 मध्ये 7,405 नागरिकांचा आकस्मिक मृत्यू झाला, तर 2021 मध्ये 7,126 जणांचा मृत्यू झाला. 2019 मध्ये आकस्मिक मृत्यूमुळे जीव गमावणाऱ्यांची संख्या 8,145 होती.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Tags:

फोटो

महत्वाच्या बातम्या