JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Sugarcane Production : आगामी हंगामात साखर उद्योगाला अच्छे दिन, साखर निर्यातीवर बंधनही नाही राहणार?

Sugarcane Production : आगामी हंगामात साखर उद्योगाला अच्छे दिन, साखर निर्यातीवर बंधनही नाही राहणार?

आगामी ऊस हंगामामध्ये साखर उद्योगाचे नियोजन आतापासूनच सुरू आहे. मागील ऊस हंगामात साखरेचे विक्रमी उत्पादन झाले. आगामी हंगामातही उत्पादन वाढण्याची शक्यता आहे. (Sugarcane Production)

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 24 जुलै : मागच्याो वर्षीचा साखर हंगाप खूपच लाबणीवर गेल्याने हजारो हेक्टर उसाच्या पिकाचे मोठे नुकसान झाले. दरम्यान बीड, उस्मानाबाद, मराठवाड्यातील कित्येक जिल्ह्यात ऊस तोडायचा राहिल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. यातून काही शेतकऱ्यांनी आत्महत्याही केल्या यामुळे आगामी ऊस हंगामामध्ये साखर उद्योगाचे नियोजन आतापासूनच सुरू आहे. मागील ऊस हंगामात साखरेचे विक्रमी उत्पादन झाले. आगामी हंगामातही उत्पादन वाढण्याची शक्यता आहे. (Sugarcane Production)

दरम्यान आगामी हंगामात साखर उद्योगाला चांगले दिवस येण्याची शक्यता आहे. मागच्या वर्षाप्रमाणे साखरेचे विक्रमी उत्पादन होण्याचे संकेत आहेत. नुकत्याच संपलेल्या हंगामाच्या तुलनेत उसाच्या क्षेत्रामध्ये 4 टक्के वाढ अपेक्षित असल्याची माहिती इस्माकडून देण्यात आली आहे. याचबरोबर साखर साठ्याची वाढणारी चिंता काही प्रमाणात कमी होण्याची शक्यता आहे. केंद्राच्या धोरणानुसार इथेनॉल निर्मितीवर भर देण्याच्यया निर्णयाने या हंगामाच्या तुलनेत 5 लाख टन इतकी साखर उत्पादनात किंचित घट अपेक्षित आहे. इंडियन शुगर मिल्स असोसिएशन (इस्मा) या साखर कारखानदारांच्या संघटनेने हा अंदाज वर्तवला आहे.

हे ही वाचा :  आमदार, खासदारांनी सोडली साथ; शिवसेना वाचवण्यासाठी आता नगरसेवक सरसावले, काय आहे प्लॅन?

संबंधित बातम्या

इस्मा या संघटनेची बैठक होऊन त्यामध्ये उसाची एकरी वाढ, ऊस उत्पादनातील अपेक्षित वाढ याबाबत चर्चा झाली. जूनच्या मध्यास प्राप्त झालेल्या उपग्रह प्रतिमाच्या आधारे केलेल्या सर्वेक्षणाच्या आधारे त्यांनी ही आकडेवारी जाहीर केली आहे. त्यामध्ये ऊस क्षेत्राचे प्रतिमा, अपेक्षित उत्पन्न, काढणीची टक्केवारी, मागील व चालू वर्षाच्या पावसाचा परिणाम, जलाशयातील पाण्याची उपलब्धता, यंदाच्या मान्सूनचा अपेक्षित पाऊस आदी मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. त्यानुसार आगामी 2022-23 या ऊस हंगाम वर्षातील साखर उत्पादन विषय प्राथमिक अंदाज जाहीर करण्यात आला आहे.  

जाहिरात

हे ही वाचा :  भीषण वास्तव! शिंदे सरकारच्या 24 दिवसांच्या काळात 89 शेतकऱ्यांच्या आत्महत्या

इथेनॉल निर्मितीच्या वाढीस चालना

अलीकडे संपलेल्या हंगामात इथेनॉल निर्मितीमुळे साखर उत्पादनात 45 लाख टन घट झाली होती. देशातील एकूण 444 कोटी लिटर इथेनॉल पैकी 362 कोटी लिटर इथेनॉल साखरेपासून उत्पादित झाले होते. पुढील वर्षी इथेनॉल इंधनामध्ये इथेनॉल मिश्रण करण्याचे प्रमाण 12 टक्के करण्याचे उद्दिष्ट आहे. त्यासाठी 545 कोटी लिटर इथेनॉलची आवश्यकता असणार आहे. यामुळे पुढील हंगामात साखर उद्योग इथेनॉल निर्मितीवर अधिक भर देऊ शकतो.

जाहिरात
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या