बीडच्या वडवणी तालुक्यातील उपळीमध्ये ज्योतिबाच्या यात्रा पार पडली. पण यात्रेला गालबोट लागले.
बीड, 18 एप्रिल : कोरोनाची (corona) लाट ओसरल्यामुळे सर्वत्र सण आणि उत्सव मोठ्या जल्लोषात साजरे केले जात आहे. पण बीडमध्ये जोतिबाच्या यात्रेला ( Jyotibas yatra) गालबोट लागण्याची घटना घडली आहे. दोन गावातील तरुणांमध्ये अचानक मारामारीला सुरुवात झाली यावेळी या तरुणांनी जोरदार दगडफेक (stone pelting) केली. ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. बीडच्या वडवणी तालुक्यातील उपळीमध्ये ज्योतिबाच्या यात्रा पार पडली. पण यात्रेला गालबोट लागले. उपळी आणि गावदरातील तरुणांमध्ये कुठल्या तरी कारणावरून अचानक मारामारी झाली. त्यानंतर या दोन्ही गटाकडील तरुणांनी जोरदार दगडफेक केली.
अचानक घडलेल्या प्रकारामुळे काही काळ या यात्रेमध्ये तणाव निर्माण झाला होता. या दगडफेकीत काहीजण जखमी झाले असून त्यांच्यावर वडवणी येथे उपचार सुरू आहेत. ( औरंगाबादमध्ये RTO कार्यालयात अग्नितांडव, अनेक वाहनं जळून खाक, घटनास्थळाचा VIDEO ) दोन गावातील आपापसात हा वाद इतका पेटला की, दोन्ही बाजूने तुफान दगडफेक झाली. यानंतर काही वेळानंतर दोन्ही गावच्या तरुणांना शांत करण्यात यश आले आहे. मागच्या दोन वर्षातील कोविडच्या काळानंतर पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणात यात्रात गर्दी होताना पाहायला मिळत आहे मात्र याच यात्रा दरम्यान वाद होताना पण आता पुढे येत आहे.