JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / लसीचे दोन्ही डोस घेतले, राज्याच्या माजी आरोग्यमंत्र्यांचा कोरोना रिपोर्ट आला

लसीचे दोन्ही डोस घेतले, राज्याच्या माजी आरोग्यमंत्र्यांचा कोरोना रिपोर्ट आला

राज्याचे माजी आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत (Dr. Deepak Sawant) यांनी कोरोना चाचणी केली असून (Corona Positive) चाचणीचा रिपोर्ट आला आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 18 जून: राज्याचे माजी आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत (Dr. Deepak Sawant) यांचा कोरोना चाचणीचा (Corona Positive) रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. दीपक सावंत यांनी कोरोनाच्या कोविशिल्ड लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत. लोकमतनं या संदर्भातलं वृत्त दिलं आहे. पालिकेकडून पॉझिटिव्ह असल्याचा फोन आला. आता दीपक सावंत यांना अंधेरी पूर्व येथील क्रिटीकेअर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. तसंच त्यांनी गेल्या आठ ते दिवसात त्यांच्या संपर्कात आलेल्यांनी कोरोनाची चाचणी करुन घ्यावी, असं आवाहन त्यांनी केलं आहे. हेही वाचा-  मोठी बातमी: एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मांनंतर NIA च्या रडारवर कोण? दीपक सावंत यांनी 16 जानेवारी आणि 16 फेब्रुवारीला कोरोना प्रतिबंधक कोविशिल्ड लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत. तसंच एक महिन्यापूर्वी 268 अँटीबॉडीज त्यांच्या शरीरात होत्या. कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत त्यांनी कोरोनावर अभ्यासपूर्ण लिखाण केलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या