JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Solapur Police Bribe Case : पोलीस ठाण्याचा प्रमुखच निघाला भ्रष्टाचारी, सोलापुरात लाचलुचपत विभागाची मोठी कारवाई

Solapur Police Bribe Case : पोलीस ठाण्याचा प्रमुखच निघाला भ्रष्टाचारी, सोलापुरात लाचलुचपत विभागाची मोठी कारवाई

सोलापूर जिल्ह्याच्या बार्शी तालुक्यातील पांगरी पोलीस ठाण्याच्या निरीक्षकासह दोघांना तीस हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

सोलापूर, 12 जानेवारी : सोलापूर जिल्ह्याच्या बार्शी तालुक्यातील पांगरी पोलीस ठाण्याच्या निरीक्षकासह दोघांना तीस हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले आहे. सोलापूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली आहे. पांगरी पोलीस ठाण्याचे प्रभारी निरीक्षक नागनाथ जयराम खूने यांनी लाच घेतल्याची तक्रार देण्यात आली होती. नाममात्र अटक करून जामिनावर सोडण्यासाठी 30 हजार रुपयांची लाच मागितल्याची तक्रार देण्यात आली होती.

हे ही वाचा :  लग्नात पाहुण्या म्हणून आल्या आणि सर्वांसमोर पैसे घेऊन पळाल्या, घटना CCTV त कैद

बार्शी तालुक्यातील पांगरी पोलीस ठाण्यात तक्रारदार आणि त्याच्या भावावर गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यामध्ये तात्पुरत्या स्वरूपात अटक करून जामिनावर सोडून देण्यासाठी प्रत्येकी 15 हजार रुपयांची लाच मागितली होती. तपास अधिकारी नागनाथ खूने आणि पोलीस शिपाई सुनील बोधमवाड यांनी प्रत्येकी 15 हजार असे एकूण 30 हजार रुपये लाचेची मागणी केली.

संबंधित बातम्या

तक्रारदार यांना लाच देणे मान्य नसल्याने त्यांनी सोलापूर एसीबीकडे तक्रार केली. एसीबीने केलेल्या तपासात सहाय्यक पोलीस निरीक्षक खुणे आणि पोलीस शिपाई बोधमवाड यांनी लाच मागितल्याचे निष्पन्न झाले होते.  बुधवारी कॅन्टीन चालक हसन सय्यद याच्याकडे तक्रारदाराला ठरलेली रक्कम देण्यास सांगितले होते.

हे ही वाचा :  सरकारी अधिकाऱ्याला कॉल गर्लचं प्रेम पडलं महागात, फोटो सोशल मीडियात व्हायरल

जाहिरात

एसीबीने सापळा रचून हसन सय्यद याला तक्रारदार याच्याकडून तीस हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले. यानंतर नागनाथ खूने आणि सुनिल बोधमवाड यांना ताब्यात घेण्यात आले. याप्रकरणी लाचलुचपत विभागाचे अधिकारी अधिक तपास करत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या