सोलापूर, 24 सप्टेंबर : दक्षिण सोलापूर तालुक्यातील मुस्ती गावात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. चक्क रात्री पोलिसांना फोन चुकीची माहिती दिल्याची घटना घडली आहे. मध्यरात्रीच्या सुमारास पोलिसांना फोन करून अकरा कुत्री विष देऊन मारल्याची माहिती देण्यात आली आहे. याचबरोबर आणखी काही कुत्री मारणार असल्याची चुकीची माहिती युवकाने दिली. यावर पोलिसांनी याची शहानिशा केल्यास घटनास्थळावर कोणताही प्रकार आढळून आला नाही.
सादुल राणू गायकवाड हा युवक दारूच्या नशेत तिथेच होता त्यानंतर वळसंग पोलिसांनी सदर युवकाविरोधात खोटी माहिती दिली म्हणून गुन्हा दाखल केला आहे. वळसंग पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार रोहित नागनाथ थोरात यांनी वळसंग पोलीसात दिलेल्या फिर्यादीनुसार 23 सप्टेंबर रोजी मध्यरात्री आरोपी सादुल राणू गायकवाड याने डायल 112 वर कॉल करून अकरा कुत्र्यांना वीष देऊन मारले आहे. आणखीन बाकी कुत्र्यांना मारणार आहे.त्याकरिता पोलीस मदत हवी आहे. अशी खोटी माहिती दिली.
हे ही वाचा : गाडीतून खाली उतरले अन्..; चहामुळे वाचला संपूर्ण कुटुंबाचा जीव, नाशिकमधील थरारक घटना
आपण पोलीसांना देत असलेली माहिती खोटी आहे. याची त्याला पूर्ण कल्पना असताना देखील त्याने दारूच्या नशेत डायल 112 वर कॉल करून शासकीय सेवकाला खोटी माहिती दिली आहे.म्हणून फिर्यादीने सदर आरोपी विरुद्ध भादवी कलम 177 प्रमाणे कायदेशीर फिर्याद दिली आहे.सदर आरोपी विरुध्द वळसंग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सोलापुरात राष्ट्रवादीच्या नेत्यावर गुन्हा
सोलापूरचे माजी महापौर मनोहर सपाटे यांच्यावर अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काल(दि.24) रात्री उशिरा त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. दरम्यान ते पळून गेल्याने त्यांना फरार घोषीत करण्यात आले आहे. त्यांना पकडण्यासाठी पोलिसांचे पथक त्यांच्या अटकेसाठी मार्गावर असून ते फरार असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उदयसिंह पाटील यांनी सांगितले.
हे ही वाचा : Mumbai : कोरोनात गेली इंजिनिअरची नोकरी, आता फुड स्टॉलमधून करतोय लाखोंची कमाई! Video
सोलापूर जिल्ह्यातील एका शिक्षण संस्थेतल्या शिक्षिकेला लग्नाचे आमिष दाखवत तिच्यावर अनेक वर्षांपासून अत्याचार केल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. तसेच नैसर्गिक आणि अनैसर्गिक अत्याचार व खंडणीचा गुन्हा देखील दाखल झाला असल्याची माहिती मिळत आहे.