JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / ...म्हणून मनसेच्या कार्यकर्त्यांवर कारवाई सुरू, गृहराज्यमंत्र्यांनी दिले स्पष्ट उत्तर

...म्हणून मनसेच्या कार्यकर्त्यांवर कारवाई सुरू, गृहराज्यमंत्र्यांनी दिले स्पष्ट उत्तर

सामान्य व्यक्तीला या गोष्टी कडून त्रास होत असेल आणि कायदा कोण हातात घेत असेल तर त्या पद्धतीने कारवाई ही होणारच

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

सातारा, 03 मे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या औरंगाबाद येथील सभेबाबत (Aurangabad Rally) आता राज ठाकरे यांच्या विरोधात औरंगाबादेत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जर ‘सामान्य व्यक्तीला या गोष्टींकडून त्रास होत असेल आणि कायदा कोण हातात घेत असेल तर त्या पद्धतीने कारवाई ही होणारच’ असं गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई (Shambhu Raje Desai ) यांनी स्पष्ट केलं आहे. राज ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. राज ठाकरे यांच्या औरंगाबाद येथील सभेला पोलीस आयुक्तांनी  काही अटींवर परवानगी दिली होती. ज्यावेळेस सभा पार पडली त्यानंतर या सभेच रेकॉर्डिंग तपासण्यात आले. यामध्ये काही अटींचे उल्लंघन झाला असेल आणि पोलीस आयुक्तांना हे निदर्शनास आला असेल त्यामुळेच ही कारवाई झाली असावी. असे मत शंभूराज देसाई यांनी व्यक्त केल आहे. ( फ्रीजमधील थंड पाणी पिण्याची चूक करू नका; इतके हेल्थ प्रॉब्लेम्स नाहक मागे लागतील ) ‘कार्यकर्त्यांवर दिलेल्या नोटीस बाबत त्यांनी कारवाई कुणा एकट्यावर होत नसते. कारण जे कोणी या सभेत उपस्थित होते त्यांच्यावर कारवाई होणे हे अभिप्रेत आहे, असंही शंभूराजेंनी स्पष्ट केलं. ‘राज ठाकरे यांनी 4 तारखेचा अल्टीमेटम दिला आहे, याबाबत बोलताना ते म्हणाले की, ‘सामान्य व्यक्तीला या गोष्टी कडून त्रास होत असेल आणि कायदा कोण हातात घेत असेल तर त्या पद्धतीने कारवाई ही होणारच असल्याचे मत राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी व्यक्त केले. औरंगाबादमधील सभेनंतर राज ठाकरेंवर कारवाई? दरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मशिदींवरील भोंग्यांच्या विरोधात भूमिका घेतली. तसेच मशिदींवरील भोंगे उतरवले नाहीत तर 4 मे पासून मशिदींसमोर भोंगे लावण्यात येईतल असा स्पष्टच इशारा दिला. औरंगाबाद पोलिसांकडून (Aurangabad Police) राज ठाकरेंच्या सभेला अटी-शर्थींसह परवानगी दिली. या सभेत राज ठाकरेंनी नियमांचं उल्लंघन केलं आहे का? याबाबत औरंगाबाद पोलिसांनी एक अहवाल तयार केला आहे. त्याच दरम्यान आज राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश सेठ (Maharashtra DGP Rajnish Seth) यांनी एक मोठं विधान केलं आहे. राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांना राज ठाकरेंच्या औरंगाबाद येथील सभेच्या संदर्भात विचारले असता त्यांनी म्हटलं, औरंगाबाद पोलीस आयुक्तानी राज ठाकरेंच्या भाषणाचा अभ्यास केला आहे. कारवाई करण्यास औरंगाबाद पोलीस आयुक्त सक्षम आहेत. आवश्यक असल्यास औरंगाबाद पोलीस योग्य ती कारवाई करतील.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या