JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / MIM ला सोलापूरात मोठं खिंडार; 6 नगरसेवकांचा राष्ट्रवादीत प्रवेश मात्र काँग्रेससमोरील आव्हान वाढलं!

MIM ला सोलापूरात मोठं खिंडार; 6 नगरसेवकांचा राष्ट्रवादीत प्रवेश मात्र काँग्रेससमोरील आव्हान वाढलं!

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये MIM च्या नगरसेवकांनी केलेल्या प्रवेशामुळे काँग्रेससमोरील आव्हान वाढलं आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

सोलापूर, 12 ऑगस्ट : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांच्या उपस्थितीत MIM पक्षाच्या 6 नगरसेवकांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. तौफिक शेख, तस्लीम शेख, नुतन गायकवाड, पुनम बनसोडे, वाहिदाबानो शेख, शहाजीदा शेख हे MIM नगरसेवक आज राष्ट्रवादीत दाखल झाले आहेत. राष्ट्रवादी प्रवेशामुळे MIM ला सोलापुरात मोठे खिंडार पडलं आहे. MIM चे नेते आणि नगरसेवक तौफिक शेख यांच्यासोबत 6 नगरसेवक राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये दाखल झाले आहेत. तौफिक शेख हे सोलापूरमधील MIM चे मातब्बर नेते असून कॉंग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांचे कट्टर प्रतिस्पर्धी आहेत. तौफिक शेख यांच्या राष्ट्रवादी प्रवेशामुळे आमदार प्रणिती शिंदे यांना कडवे आव्हान उभे राहण्याची शक्यता आहे. तौफिक शेख यांच्यासह शेकडो समर्थकांनी आज राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. महाविकास आघाडीत होणार मोठा वाद? कोणी नाराज तर कोणी आक्रमक, नेमकं चाललंय काय? 2017 च्या महानगरपालिका निवडणुकीत MIM चे आठ नगरसेवक निवडून आले होते. पण अंतर्गत राजकीय वादामुळे एमआयएमचे माजी शहर अध्यक्ष तौफिक शेख यांच्यासह सात माजी नगरसेवक जयंत पाटील यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या