ब्रिटन आणि अमेरिकेत केलेल्या संशोधनात डॉक्टरांना लक्षणांची 6 क्लस्टर्स सापडली आहेत. त्यात कोरोनाची सर्व लक्षणे आढळून येत असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.
इंदापूर, 23 मे : मुंबईच्या विविध भागातून इंदापूरमध्ये आलेले 4 नागरिक कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याचं समोर आलं आहे. धक्कादायक बाब म्हणजे या लोकांनी मुंबईवरून गावी आल्यानंतर आपली माहिती लपवली होती. मुंबई महानगरातील अंधेरी येथून खाजगी वाहनाने चार नागरिक 14 मे 2020 रोजी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास आले होते. सदर व्यक्तींनी प्रशासनाची कोणतीही परवानगी घेतली नाही तसेच वैद्यकीय तपासणी केली नाही. इंदापूर येथे त्यांची तपासणी केली असता दोन जणांना कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाले. त्यांना इंदापूर येथील डॉक्टर कदम गुरुकुल येथील कोव्हि़ड -19 कक्षात पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आलेलं आहे. परवानगी न घेता मूळ गावी आलेल्या नागरिकांची माहिती प्रशासनाला दिली नाही व प्रशासनाची फसवणूक केली म्हणून शिरसोडी येथील एका व्यक्तीवर आणि बिजवडी येथील दोन व्यक्तींवर भारतीय दंड विधान कायदा कलम 269, 270 आणि साथीचे रोग प्रतिबंध कायदा कलम 2, 3, 4 या प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. दुसरीकडे, मुंबई शहरातील मुलुंड भागातून 11 मे 2020 रोजी 3 इसम इंदापूरमध्ये आले होते. प्रशासनाची परवानगी न घेता व वैद्यकीय तपासणी न करता बिजवडी येथे आले होते. इंदापूर येथे तपासणी केली असता दोन जण पॉझिटिव्ह कोरोनाग्रस्त म्हणून आढळून आले. प्रशासनाला माहिती दिली नाही ही माहिती लपवून ठेवली म्हणून शिरसोडी येथील एका इसमाच्या विरुद्ध व बिजवडी येथील दोन व्यक्तींच्या विरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे हेही वाचा - पुण्यातील सर्वात मोठ्या झोपडपट्टीतून कोरोनाबाबत आली नवी माहिती दरम्यान, इंदापूर पोलीस स्टेशन हद्दीतील सर्व गावातील नागरीकांना बाहेर गावावरून मुंबई, पुणे व इतर शहरातून कोणीही आल्यास त्यांची माहिती तात्काळ पोलीस स्टेशन तसेच प्रशासनास देणे बाबत इंदापूर पोलीस निरीक्षक नारायण सारंगकर यांनी आवाहन केलेले आहे. संपादन - अक्षय शितोळे