JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / नारायण राणे जनतेच्या टॅक्सच्या पैशावर मजा मारणारे कुटुंब, तर सोमय्यांवरही सुषमा अंधारेंचा प्रहार

नारायण राणे जनतेच्या टॅक्सच्या पैशावर मजा मारणारे कुटुंब, तर सोमय्यांवरही सुषमा अंधारेंचा प्रहार

विशाल रेवडेकर, प्रतिनिधी सिंधुदुर्ग. 22 नोव्हेंबर : केंद्रीय मंत्री नारायण राणे हे जनतेच्या टॅक्सच्या पैशावर मजा मारणारे कुटुंब आहे, अशी खरमरीत टीका शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी केली आहे. आपण कणकवलीत राणेंच्या विरुद्ध शब्दांना आवर घातला नाही. जे लोक घाबरट असतात त्यांना गुंडशक्तीचा आधार घ्यावा लागतो. त्यांच्या विरुद्ध आम्ही रणरागिणीच काफी आहोत, असा दमही त्यांनी भरला. किरीट सोमय्यांवरही सुषमा अंधारेंनी केली टीका - किरीट सोमय्या हे कंत्राटी कामगार आहेत का, ईडीने त्यांना ईडीने कंत्राटी कामगार म्हणून नेमले आहे का, अशा शब्दात शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी किरीट सोमय्या यांना डिवचलं.

जाहिरात

सुषमा अंधारेंची जोरदार टीका

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

विशाल रेवडेकर, प्रतिनिधी सिंधुदुर्ग. 22 नोव्हेंबर : केंद्रीय मंत्री नारायण राणे हे जनतेच्या टॅक्सच्या पैशावर मजा मारणारे कुटुंब आहे, अशी खरमरीत टीका शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी केली आहे. आपण कणकवलीत राणेंच्या विरुद्ध शब्दांना आवर घातला नाही. जे लोक घाबरट असतात त्यांना गुंडशक्तीचा आधार घ्यावा लागतो. त्यांच्या विरुद्ध आम्ही रणरागिणीच काफी आहोत, असा दमही त्यांनी भरला. किरीट सोमय्यांवरही सुषमा अंधारेंनी केली टीका - किरीट सोमय्या हे कंत्राटी कामगार आहेत का, ईडीने त्यांना ईडीने कंत्राटी कामगार म्हणून नेमले आहे का, अशा शब्दात शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी किरीट सोमय्या यांना डिवचलं. तसेच नारायण राणे खतम, असे म्हणणाऱ्या किरीट सोमय्यांना राणेंना मंत्री पद मिळाल्यानंतर मुंबईत राणेंना पायघड्या टाकणारे तेच किरीट सोमय्या आहेत, अशी टीकाही त्यांनी केली. इतकेच नव्हे तर भाजपने त्यांना समजून घ्यावे, भाजपने मंत्री पद देऊन त्यांचे पुनर्वसन केलं पाहिजे, असे सांगतानाच अध्यक्ष महोदय हे बरोबर नाही हे चुकलेलं आहे, असे म्हणत त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना कोपर खळी लगावली. हेही वाचा -  मुंबईत पार्किंगसाठी काही धोरण आहे का? हायकोर्टाचा शिंदे सरकारला सवाल वंचित आघाडीसोबत युती होणार का? संजय राऊत काय म्हणाले - हा विषय फक्त मुंबई महापालिकेसाठी मर्यादीत नाही तर राज्यात परिवर्तन घडवण्यासाठी महत्त्वाचा विषय आहे. प्रकाश आंबेडकर जर एकत्र आले तर देशासाठी एक चांगला फॉर्म्युला आहे, असं म्हणत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी वंचित आघाडीसोबत युतीबद्दल स्पष्ट संकेत दिले. ‘रावसाहेब दानवे यांनीच मध्यावधीची निवडणुकीचे संकेत दिले आहे. दानवे कधी कधी चुकून खरं बोलून जातात. दोन महिन्यात मध्यावधी निवडणुकीची घोषणा होऊ शकते. याबद्दल माझ्याकडे पूर्ण माहिती आहे, आणि त्याची खात्री आहे, असंही राऊत म्हणाले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या