JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / एक नेता…एक पक्ष…एक विचार…एक लव्य…एक नाथ, शिंदेंच्या दसरा मेळाव्याचा पहिला टिझर

एक नेता…एक पक्ष…एक विचार…एक लव्य…एक नाथ, शिंदेंच्या दसरा मेळाव्याचा पहिला टिझर

दसरा मेळाव्यासाठी शिंदे गटाच्या शिवसेनेकडून जोरदार तयारी सुरू आहे. मुंबईच्या बीकेसी मैदानामध्ये शिंदे गटाचा दसरा मेळावा होणार आहे.

जाहिरात

अनेक जण आपल्यासोबत येण्यास इच्छुक आहेत, त्यामुळे अनेकांचे प्रवेश दसरा मेळाव्यात होतील,'

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 29 सप्टेंबर : 5 ऑक्टोबरच्या दसरा मेळाव्यासाठी शिंदे गटाच्या शिवसेनेकडून जोरदार तयारी सुरू आहे. मुंबईच्या बीकेसी मैदानामध्ये शिंदे गटाचा दसरा मेळावा होणार आहे. या मेळाव्याचं पहिलं पोस्टर आणि टिझर आता समोर आलं आहे. या पोस्टरला एक नेता, एक पक्ष, एक विचार, एक लव्य, एक नाथ असं कॅप्शन देण्यात आलं आहे. सोबतच या पोस्टरमध्ये बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोटो वापरण्यात आला आहे. तसंच सगळ्यात वरती डाव्या बाजूला छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो आणि उजव्या बाजूला शिवसेनेचं धनुष्यबाण हे चिन्ह लावण्यात आलं आहे. हिंदवी तोफ पुन्हा धडाडणार, गर्व से कहो हम हिंदू है, असंही या पोस्टरमध्ये लिहिण्यात आलं आहे. 5 ऑक्टोबरला संध्याकाळी 5 वाजता वांद्र्याच्या बीकेसी मैदानामध्ये शिंदे गटाच्या दसरा मेळाव्याला सुरूवात होणार आहे. याचवेळी उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेचा दसरा मेळावा दादरच्या शिवाजी पार्कवर होईल.

दसरा मेळाव्याची तयारी शिंदे गटाने कालच दसरा मेळाव्याच्या पूर्व तयारीसाठी बैठक घेतली होती. या बैठकीत एकनाथ शिंदे यांनी सुप्रीम कोर्टाच्या निकालाबाबत समाधान व्यक्त केलं. सुप्रीम कोर्टात लागलेल्या निकालाबद्दल आनंद व्यक्त केला. ‘कालचा निकाल आपल्यातला उत्साह वाढवणारा आहे. या निकालामुळे अनेकांचे धाबे दणाणले आहेत. आता आपण दसरा मेळावा उत्साहात साजरा करायचा आहे. त्यासाठी साधारणत: अडीच ते तीन लाख लोक येण्याची शक्यता आहे,’ असं मुख्यमंत्री म्हणाले होते.

‘दसरा मेळाव्यासाठी येणाऱ्या गाड्यांसाठी दहा मैदानं बूक केली आहेत. अनेक जण आपल्यासोबत येण्यास इच्छुक आहेत, त्यामुळे अनेकांचे प्रवेश दसरा मेळाव्यात होतील,’ असा गौप्यस्फोट एकनाथ शिंदे यांनी केला. ‘दसरा मेळाव्यासाठी जे कार्यकर्ते येतील त्यांच्या जेवणाची, पाण्याची आणि वॉशरूमची व्यवस्था नीट झाली पाहिजे. हे कार्यकर्ते आपल्यासाठी येत आहेत, त्यामुळे त्यांच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही,’ अशा सूचना एकनाथ शिंदे यांनी नेत्यांना दिल्या आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या