JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / VIDEO: शिवसेना विरुद्ध भाजप वाद पेटला! किरीट सोमय्यांच्या गाडीवर शिवसैनिकांकडून दगडफेक

VIDEO: शिवसेना विरुद्ध भाजप वाद पेटला! किरीट सोमय्यांच्या गाडीवर शिवसैनिकांकडून दगडफेक

Shivsainik thrown ink on Kirit Somaiya vehicle in Washim: आक्रमक झालेल्या शिवसैनिकांनी किरीट सोमय्यांच्या गाडीवर शाईफेक केली.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

वाशिम, 20 ऑगस्ट : भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) आज वाशिम दौऱ्याची सुरूवात राड्यानं झाली आहे. रिसोड तालुक्यातील देगाव येथे शिवसैनिकांनी भाजप नेते किरीट सोमय्यांना काळे झेंडे दाखविले. इतकेच नाही तर यावेळी शिवसैनिकांनी सोमय्यांच्या गाडीवर शाई फेकण्याचा (Ink thrown on vehicle) प्रयत्न केलाय. यावेळी जमावाला पांगवण्यासाठी शिवसैनिकांवर पोलिसांचा लाठीमार केलाय.

या दौऱ्यात किरीट सोमय्या देगाव येथील भावना गवळी यांच्या रिसोड येथील बालाजी पार्टिकल बोर्ड या कारखान्याला भेट देणार आहेत. किरीट सोमय्या यांनी शिवसेना खासदार भावना गवळी यांच्यावर भ्रष्टाचार, आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप केले आहेत. स्वत: किरीट सोमय्या यांनीही या घटनेचे फोटोज ट्विट केले आहेत.

BIG BREAKING: समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, 12 जणांचा मृत्यू शिवसेना खासदार भावना गवळी यांनी बालाजी पार्टीकल बोर्ड कारखान्यात 100 कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप काही दिवसांपूर्वी किरीट सोमय्या यांनी केला होता. त्यानंतर किरीट सोमय्या हे वाशिम दौऱ्यावर दाखल झाले असताना शिवसैनिकांनी आक्रमक होत त्यांच्या विरोधात आंदोलन केले. किरीट सोमय्या हे वाशिम दौऱ्यावर येणार असल्याने शिवसैनिक आक्रमक झाले होते. शिवसैनिकांचा आक्रमक पवित्रा पाहून सोमय्यांच्या दौऱ्यात चोख पोलीस बंदोबस्त करण्यात आला होता. मात्र, तरीही आक्रमक झालेल्या शिवसैनिकांनी सोमय्यांच्या ताफ्यावर दगड भिरकावला आणि शाईफेक केली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या