शिवसेनेची लढाई निवडणूक आयोगात
नवी दिल्ली, 20 जानेवारी : शिवसेना कुणाची? यावरून सुरू असलेला शिंदे-ठाकरे गटातला वाद निवडणूक आयोगाच्या कोर्टात पोहोचला आहे. या वादाच्या सुनावणीला सुरूवात झाली आहे. या सुनावणीसाठी आजचा दिवस महत्त्वाचा आहे, कारण 23 जानेवारीला उद्धव ठाकरे यांचा पक्षप्रमुखपदाचा कार्यकाळ संपणार आहे.