ठाणे, 23 जून : आजपासून राज्यात सर्वत्र प्लास्टिक बंदी झालीये मात्र अजूनही अनेकांना याचे भान नसल्याचे समोर येत आहे. सवयी प्रमाणे मान्यवरांचे स्वागत करताना प्लास्टिकने गुंडाळलेले बुके देऊन सर्रास सर्वत्र स्वागत केलं जातंय. ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनीही असाच प्रकार केलाय.
ठाण्यात आयोजित एका पत्रकार परिषदेत काही मान्यवर आणि निवडणुकीत पाठिंबा जाहीर करणाऱ्यांचे स्वागत पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. यावेळी त्यांना विसर पडला असावा की आजपासून प्लास्टिक बंदी झालीये. त्यांना ही बाब लक्षात आणून दिली आणि यांवर प्रश्न विचारला असता त्यांनी यांवर बोलणं टाळलं आणि आपली चूक लक्षात आल्यावर पुढील सत्कारसाठी बुकेवरील प्लास्टिक काढायला लावले मग काय स्वत: शिवसेनेचे कोकण पदवीधर मतदार संघाचे उमेदवार संजय मोरे यांनी लगेच बुकेवरील प्लास्टिक काढले आणि प्लास्टिक विरहीत बुके देऊन सत्कार केला गेला.