आजपासून संपूर्ण महाराष्ट्रात प्लॅस्टिक बंदी

पर्यावरण रक्षणासाठी राज्य सरकारची महत्त्वाकांक्षी प्लास्टिकबंदी आजपासून लागू होतेय.

Renuka Dhaybar | News18 Lokmat | Updated On: Jun 23, 2018 09:23 AM IST

आजपासून संपूर्ण महाराष्ट्रात प्लॅस्टिक बंदी

मुंबई, 23 जून : पर्यावरण रक्षणासाठी राज्य सरकारची महत्त्वाकांक्षी प्लॅस्टिकबंदी आजपासून लागू होतेय. या बंदीची काटेकोर अंमलबजावणी केली जाणार असल्याचं सांगण्यात येतंय.

दरम्यान, मुंबई उच्च न्यायालयानं याच प्लॅस्टिक बंदीविरोधातील याचिकांची सुनावणी 20 जुलैपर्यंत तहकूब केली आहे. मा न्यायालयाने याप्रकरणी अंतरिम दिलासा दिला नव्हता त्यामुळं त्यात वाढ करण्याचा प्रश्नच नाही, असं न्यायालयाने स्पष्ट केलं. त्यामुळे ही बंदी लागू होण्यात कोणताही अडसर उरलेला नाही.

प्लॅस्टिकबंदी प्रभावी व्हावी यासाठी प्रथम प्लॅस्टिक उत्पादक कारखान्यांवर छापे टाकण्याची योजना आहे. तर दुसरीकडे प्लॅस्टिकची उत्पादने तयार करणाऱ्या कारखान्यांवर तातडीनं छापे टाकून गुन्हे दाखल करण्याचे आदेश पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी प्रशासनास दिलेत.

या प्लास्टिकवर बंदी नाही!

मात्र, सामान्य माणसाला कारवाईचा कोणताही त्रास होणार नाही याची दक्षता घ्या, असेही कदम यांनी अधिकाऱ्यांना बजावलंय.

Loading...

सरकारने केलेल्या या प्लॅस्टिकबंदीला सिने अभिनेता अजय देवगण आणि काजोल यांनीही पाठिंबा दर्शवलाय. राज्य सरकार आणि बीएमसीने आयोजित केलेल्या कार्यक्रमात हे दोघे सहभागी झालेत.

'सिंघम'चा प्लास्टिकबंदीला पाठिंबा,पण जाहिरात केलेल्या पान मसाल्याचा सर्वात जास्त कचरा !

या प्लॅस्टिक बंदीला पर्याय काय यासंबंधीचं प्रदर्शनही यावेळी आयोजित करण्यात आलं होतं. त्यामुळे आता प्लॅस्टिकबंदीला सगळ्यांकडून कसा प्रतिसाद मिळतोय हे पाहणंही महत्त्वाचं आहे.

प्लास्टिकबंदीत अमृताताई आमच्यासोबत,मुख्यमंत्र्यांच्या दबावाचा प्रश्नच नाही-रामदास कदम

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 23, 2018 09:17 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...